नागपूर, दि.17 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या ‘स्वराज्य महोत्सवाचे’ आयोजन सुरू आहे. आज या महोत्सवात जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी बरोबर अकरा वाजता समूह राष्ट्रगीत गायन झाले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व कर्मचारी यावेळी बचत भवनमध्ये उपस्थित होते. जिल्हाधिकारी आर. विमला यांनी सर्वप्रथम आजच्या दिनाचे औचित्य व राष्ट्रगीत निर्मिती आणि समूह गानाचे महत्व याबाबतचे निवेदन केले. त्यानंतर बरोबर 11 वाजता समूह राष्ट्रगीत झाले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसह निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर व सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.