नागपूर :-सामाजिक क्रांतीचे जनक, महिला शिक्षणाचे प्रणेते राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 132 व्या स्मृतिदिना निमित्त नागपूर जिल्हा बसपाच्या वतीने कॉटन मार्केट चौकातील महात्मा फुलेंच्या पुतळ्याला प्रदेश सचिव पृथ्वीराज शेंडे, रंजना ढोरे, प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे, जिल्हा प्रभारी राहुल सोनटक्के, जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम, जिल्हा उपाध्यक्ष अमित सिंग माजी नगरसेवक संजय जयस्वाल यांच्या प्रमुख उपस्थितीत माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी फुले दांपत्यांना भारतरत्न देण्यात यावे अशी प्रमुख मागणी करून महापुरुषांच्या स्मारकाच्या देखभालीकडे दुर्लक्ष केल्याने याप्रसंगी मनपाचा जाहीर निषेध आला. “महापुरुषो के सन्मान में बीएसपी मैदान मे, फुले दांपत्यांना भारतरत्न मिळालेच पाहिजे, फुल्यांचे हंटर कमिशन समोरील मोफत व सक्तीचे शैक्षणिक धोरण जे संविधानाने आरटीई अंतर्गत स्वीकारले आहे त्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे, बहुजनांना बरबाद करणारे नवीन मनुवादी शैक्षणिक धोरण रद्द करावे, फुल्यांचे समग्र वांग्मय व भारतीय संविधानाच्या प्रती विपुल प्रमाणात उपलब्ध कराव्या” आदि घोषणा व मागण्या या ठिकाणी करण्यात आल्या.
या ठिकाणी झालेल्या छोटेखानी सभेचे सूत्रसंचालन जिल्हा सचिव डॉक्टर शितल नाईक यांनी केले. उत्तम शेवडे, संदीप मेश्राम ह्यांनी महात्मा फुले यांच्या जीवन कार्यावर व सरकारच्या भूमिकेवर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचा समारोप जिल्हा महासचिव प्रताप सूर्यवंशी यांनी केला.
याप्रसंगी प्रामुख्याने महिला नेत्या सुरेखा डोंगरे, वर्षा वाघमारे, महेश सहारे, अभिलेश वाहने, माजी नगरसेवक इब्राहिम टेलर, सागर लोखंडे, गौतम पाटील, अविनाश नारनवरे, योगेश लांजेवार, विलास सोमकुवर, सदानंद जामगडे, मुकेश मेश्राम, प्रवीण पाटील, जगदीश गजभिये, वीरेंद्र कापसे, गौतम गेडाम, सचिन मानवटकर, सुबोध साखरे, नितीन वंजारी, वामन सोमकुवर, अंकित थुल, प्रकाश फुले, प्रा सुनील कोचे, चंद्रशेखर कांबळे, अनिल मेश्राम, जगदीश गेडाम, परेश जामगडे, बुद्धम राऊत, मनोज रंगारी, चंद्रसेन पाटील, विशाल बनसोड, सुनील सोनटक्के, विकास नारायणे, दयाशंकर कांबळे, हेमंत बोरकर, राजेंद्र सुखदेवे, मॅक्स बोधी, संभाजी लोखंडे, श्यामराव तिरपुडे, कैलास खोंडे, सुरेश शेंडे, भानुदास ढोरे आदि प्रमुख आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.