संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धांगिनी परमपूज्य रमाई आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रम आज मंगळवार 07 फेब्रुवारी 2023 ला सकाळी 10:30 वाजता परमपूज्य रमाई आंबेडकर पुतळा परिसर पोरवाल कॉलेज मेन गेट समोर गौतम नगर प्रभाग 15 कामठी येथे घेण्यात आला.
भाजपा अनुसूचित जाती आघाडी कामठी शहर अध्यक्ष विक्की बोंबले, माजी नगरसेविका संध्या रायबोले यांनी माल्यार्पण करून अभिवादन केले रोशनी कानफाडे यांनी रमाई आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवन कार्याबद्द्ल उपस्थितांना माहिती दिली यावेळी संजय कनोजिया अध्यक्ष भाजपा कामठी शहर, लाला खंडेलवाल कार्याध्यक्ष भाजपा कामठी शहर, भाजपा पदाधिकारी उज्वल रायबोले, नेहा शहारे,सरोज बागड़े, किरण मानवटकर, ज्योति नागदेवे, शेवंता चांदोरकर, प्रिया चहांदे, प्रतिक पडोळे, जितेंद्र खोब्रागडे, बादल कठाने, रामसिंग यादव, स्वप्निल फुले, रोहित दहाट, विशाल डांगे, कुणाल झोड़ापे सागर राघोते, विरेंद्र राऊत आणि शिवचरण सहारे प्रामुख्याने उपस्थित होते