मनपाची ३ ते ५ डिसेंबर दरम्यान भव्य वॉल पेंटिंग स्पर्धा

मोठ्या संख्येत सहभागी होण्याचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांचे आवाहन

नागपूर :- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्य नागपूर महानगरपालिकेच्या वतीने नागपूर शहरातील शासकीय व निम शासकीय इमारतीच्या कुंपण भित्तीवर मोक्याच्या ठिकाणी भित्ती चित्र रेखाटन स्पर्धेचे (wallpainting competition) आयोजन दिनांक ३ डिसेंबर २०२२ ते ५ डिसेंबर २०२२ दरम्यान करण्यात आले आहे. या स्पर्धेत चित्रकार विद्यार्थी आणि व्यवसायिक चित्रकारांनी मोठ्या संख्येत सहभागी नोंदवावा असे आवाहन मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी केले.

मनपाचे अतिरिक्त आयुक्त  राम जोशी यांनी सांगितले की, सदर स्पर्धा ही दोन गटात घेण्यात येणार आहे त्यात महाविद्यालयीन विद्यार्थी यांचा गट आणि व्यावसायिक चित्रकार असा दुसरा गट असणार आहे. चित्रकारांना स्वच्छ भारत अभियानावर आधारित ३२ विषयाला अनुसरून शासकीय व निमशासकीय इमारतीच्या भिंतीवर चित्र काढायचे आहे. तसेच दर्शनीय खाजगी भिंतींवर त्यांच्या सहमतीने चित्र काढायचे आहे. याकरिता चित्रकाराला सहमती घेणे आवश्यक आहे. यात चार ते पाच कलावंताचा व विद्यार्थ्यांचा गट तयार करून भित्ती चित्र काढावयाचे आहे. स्पर्धेची साहित्य सामग्री आयोजकाकडून पुरविण्यात येणार आहे. स्पर्धकांसाठी नमूद केलेल्या कालावधीतच भित्ती चित्र पूर्ण करणे अपेक्षित आहे. प्रत्येक कलावंताला सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. याकरिता भिंत १० मिटर लांबीची असणे आवश्यक आहे. चित्रकला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी त्यांच्या महाविद्यालयातून स्पर्धेची नोंदणी करावयाची आहे. व्यवसायीक चित्रकारांनी आपली नोंदणी शासकीय चित्रकला महाविद्यालय दीक्षाभूमी येथुनच करावी. महाविद्यालयीन विद्यार्थी चित्रकारांनी त्यांच्या चित्रांची त्यांच्या महाविद्यालयीन प्राध्यापक किंवा आयोजकामार्फत निवड करावी. पुरस्कारांची निवड पुरस्कार निवड समिती तर्फे करण्यात येणार आहे, व ते सर्वांना मान्य राहील. पुरस्कार वितरणाची तारीख व दिवस आपणास मोबाईल द्वारे कळविण्यात येणार आहे. स्पर्धेत नाव नोंदणी करण्याची अंतिम तारीख ही २३ नोव्हेंबर असून, सर्व चित्रकला महाविद्यालयातर्फे आलेल्या स्पर्धक प्रवेशिका २६ नोव्हेंबर पर्यंत स्वच्छ भारत अभियान कक्ष , महानगरपालिका , नागपूर यांना सुपुर्द करण्यात यावे असेही त्यांनी सांगितले.

अधिक माहितीसाठी स्पर्धेचे समन्वयक :  राजकुमार बोंबाटे, मो . ९९२३५९४७७१ , ९५१८५८१००३ आणि  सूर्यकांत मंगरूळकर मो . ९ ४२२८१० ९ ३४,८२०८८७३८२५ यांच्याशी संपर्क साधावा.

स्पर्धेचे विषय

क्लीन हेरिटेज ऑफ नागपूर,

क्लीन ऑरेंज सिटी.

क्लीन टाइगर कॅपिटल ऑफ इंडिया.

ग्रीन सिटी.

क्लीन झिरो माइल.

क्लीन रिलीजियस प्लेसेस (उदा.गणेश टेकडी दीक्षाभूमी आदी.)

क्लीन वॉटर बॉडी.

स्पेशल फेस्टिवल ऑफ नागपूर( उदा. मारबत.)

क्लीन मार्केट.

डोअर टू डोअर कलेक्शन.

सोर्स सेगरीगेशन.

Wet, dry, sanitary and domestic hazardous waste.

Littering garbage vulnerable points.

प्रोसेसिंग बाय वर्क वॉटर जनरेटर्स.

होम कंपोस्टिंग.

प्लास्टिक बॅन प्लास्टिक फ्री नागपूर.

सी अँड डी वेस्ट.

शहर सौंदर्यीकरण (सिटी ब्युटीफिकेशन).

थ्री आर प्रिन्सिपल्स ( रेडिओज, रियूज, रिसायकल).

ई वेस्ट मॅनेजमेंट.

डेली वेस्ट कलेक्शन फ्रॉम हाऊसहोल्ड/ इस्टॅब्लिशमेंट /इन्स्टिट्यूशन.

क्लीन नेबरहूड.

पब्लिक टॉयलेट ऑन गुगल मॅप्स.

क्लीन सिटी.

पीपल बिहेवियर मॅनेजिंग देअर वेस्ट रिस्पॉन्सिबिलिटी.

ओपन डेफिनेशन अँड ओपन urination.

अक्सेसेबल अँड क्लीनर कम्युनिटी अँड पब्लिक टॉयलेट.

इशूज रिगार्डिंग चोक सीव्हीआर लाईन ऑर desluding of septic tank handled on priority.

सॅनिटरी वर्कर्स बेरिंग सेफ्टी गिअर्स.

स्वच्छता संदेश ( अवेअरनेस मेसेज).

कापडी पिशवी (कॅरिंग क्लोथ बॅग).

आदी विषय.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

चित्रपटगृहात जाऊन मारहाण करणे शिंदे फडणवीसांच्या राज्यात सहन करणार नाही -भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा

Sun Nov 13 , 2022
कोल्हापूर :-  एखाद्या चित्रपटातील काही दृश्यांबाबत आक्षेप असेल तर त्याच्या विरोधात तक्रार करता येईल किंवा शांततामय पद्धतीने विरोधही करता येईल. पण चित्रपटगृहात जाऊन मारहाण करण्याची दादागिरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यात कोणीही सहन करणार नाही, असा इशारा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष  चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी दिला. बावनकुळे कोल्हापूर जिल्ह्याच्या संघटनात्मक प्रवासात आहेत. कोल्हापूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com