नागपूर :- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात आज उपायुक्त दीपाली मोतीयेळे यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी उपायुक्त प्रदीप कुलकर्णी, प्रभारी उपायुक्त गुणवंत खोब्रागडे, सहायक आयुक्त दीपक वजाळे, तहसिलदार नारायण ठाकरे, नायब तहसिलदार ताराचंद कावडकर, नितीन डोईफोडे यांच्यासह अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती.