नागपूर :- भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची जयंती आज विभागीय आयुक्त कार्यालयात साजरी करण्यात आली.
आयुक्तालयातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात सामान्य प्रशासन अपर आयुक्त प्रदीप कुलकर्णी यांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
प्रादेशिक विभागीय चौकशी अधिकारी दिपाली मोतियेळे यांच्यासह उपस्थित अधिकारी -कर्मचाऱ्यांनी यावेळी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी कुलकर्णी यांनी उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली.