संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- येथील समाजकार्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या कार्यकारी प्राचार्य डॉ. रुबीना अन्सारी होत्या तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. उज्ज्वला सुखदेवे व कार्यक्रम समन्वयक डॉ. राष्ट्रपाल मेश्राम मंचावर उपस्थित होते.
प्रा. उज्ज्वला सुखदेवे यांनी बदलती जीवनशैली व योग या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. योग हा शारीरिक व मानसिक सुसंस्काराचा अत्यंत मूलगामी मार्ग आहे असे विचार त्यांनी प्रकट केले. डॉ. रुबीना अन्सारी यांनी मानसशास्त्र व योग यांचा समन्वय साधून मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. राष्ट्रपाल मेश्राम यांनी केले तर आभार डॉ. मनीष मुडे यांनी मानले.
कार्यक्रमाला डॉ. प्रणाली पाटील, डॉ. सविता चिवंडे डॉ.मनोज होले, प्रा. डॉ. हर्षल गजभिये, प्रा.राहुल जुनगरी, प्रा. राम बुटके, प्रा. गिरीश आत्राम, प्रा. आवेशखरणी शेख, शिक्षकेतर कर्मचारी प्रफुल्ल बागडे, उज्ज्वला मेश्राम, किरण गजभिये, प्रतीक कोकोडे, शशील बोरकर, वसंता तांबडे, नीरज वालदे राहुल पाटील तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.