स्व.राजीव गांधी पुण्यतिथी निमित्त म.न.पा.तर्फे अभिवादन

– म.न.पा.त दहशतवाद विरोधी व हिंसाचार विरोधी दिवस संपन्न

नागपूर :- 21 व्या शतकाचे आवाहन स्विकारून भारताला एक प्रगत राष्ट्र म्हणून पुढे आणण्यासाठी दूरसंचार तसेच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात ज्यांचे कार्यकाळात भरीव कामगिरी करण्यात आली असे भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्व.राजीव गांधी यांचा स्मृतीदिन देशभर “दहशतवाद व हिंसांचार विरोधी दिवस” म्हणून पाळण्यात येतो.

म.न.पा. केन्द्रीय कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात स्व.राजीव गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त राजीवजींच्या तैलचित्राला आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

यावेळी आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना दहशतवाद व हिसांचार विरोधी प्रतिज्ञा दिली. याप्रसंगी मुख्य अभियंता राजीव गायकवाड, सहा. आयुक्त महेश धामेचा, वैद्यकीय अधिकारी डॉ. दिपक सेलोकर, डॉ. गोवर्धन नवखरे, डॉ. विजय जोशी, उपायुक्त गजेंद्र महल्ले, कार्यकारी अभियंता अल्पना पाटणे, येलचटवार, निगम अधिक्षक श्याम कापसे, सहा. अधिक्षक राजकुमार मेश्राम आणि मोठया संख्येनी कर्मचारी उपस्थित होते.

माजी पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त जनसंपर्क अधिकारी मनिष सोनी यांनी आज सकाळी अजनी चौक स्थित स्व. राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

धाबा प्रीमियर क्रिकेट लीगमध्ये स्वराज फायटर विजय

Tue May 21 , 2024
– सचिन ताजणेकर सामनावीर ठरला. टूर्नामेंटचा सामनावीर विजेतेपद तेजस बोंद्राच्या नावावर आहे नागपूर :- DPL (धाबा प्रीमियर लीग) चा अंतिम सामना रविवार 19/5/2024 रोजी ढाबा एअरफोर्स ग्राऊंडवर खेळला गेला ज्यामध्ये कर्तव्य रक्षकाच्या नेतृत्वाखाली स्वराज फायटरने अंतिम सामना जिंकून ट्रॉफी आणि रोख रक्कम जिंकली. ज्यामध्ये सचिन ताजणेकरच्या उत्कृष्ट अष्टपैलू कामगिरीमुळे स्वराज फायटर संघाला एकतर्फी विजय मिळाला. दुसरीकडे, एसआर संघ उपविजेता संघ […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com