नागपूर :- सामाजिक क्रांतीचे अग्रदूत अस्पृश्य उद्धारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त गुरूवारी (११ एप्रिल) भारतीय जनपा पार्टीतर्फे अभिवादन करण्यात आले. वाठोडा येथे भाजपा प्रदेश उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी राजेंद्र चकोले, अशोक देशमुख, सुरेश बराई, राजेश संगेवार, किशोर सायगन, राहुल महात्मे, नारायणसिंग गौर, राम बिलकर, भूपेश अंधारे, विक्रम डुंबरे, सीमा ढोमणे, कल्पना सर्वे, सिंधु पराते, ज्योती वाघमारे, माया वानखेडे, मोसमी वासनिक, समिता चकोले, शीला वासमवार आदी उपस्थित होते.
यावेळी ॲड. मेश्राम म्हणाले, महात्मा ज्योतिबा फुले यांनी अस्पृश्यतेने वखवखलेल्या देशात सामाजिक क्रांतीची ठिणगू पेटवली. अस्पृश्यांना जेव्हा पिण्याचे पाणीही मिळत नव्हते तेव्हा ज्योतिबांनी घरचा पाण्याचा हौद खुला केला. शिक्षणापासून वंचित ठेवले जात होत तेव्हा महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाईंनी शेण, माती, दगडाचा मारा सहन करून देशातील महिलांना, अस्पृश्यांना शिक्षणाची दारे खुली करून दिली. म्हणूनच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले यांना गुरू मानायचे. बाबासाहेबांच्या गुरूस्थानी असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले यांचे कार्य आणि विचार नेहमी प्रेरणादायी असल्याचेही ते म्हणाले.