दि.वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनात अभिवादन

मुंबई :- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि हरित-धवल क्रांतीचे प्रणेते दि. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आज विधानभवन परिसरातील त्यांच्या पुतळ्यास महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य राजेश राठोड, अमोल मिटकरी, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (2) (कार्यभार) विलास आठवले यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही स्व. वसंतराव नाईक यांच्या पुतळ्यास गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

शिक्षकांना जुन्या निवृत्ती वेतनाचा पर्याय देण्याबाबत पुढील तीन महिन्यांच्या आत निर्णय घेण्यात येणार - उपमुख्यमंत्री अजित पवार

Mon Jul 1 , 2024
मुंबई :- राज्यातील निमशासकीय आणि अनुदानित संस्थांमध्ये काम करणारे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी १ नोव्हेंबर २००५ पूर्वी निघालेल्या जाहिरातीनुसार त्यानंतरच्या कालावधीत सेवेत रुजू झाले असल्यास त्यांनाही जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय देण्याचा निर्णय पुढील तीन महिन्यांच्या आत घेण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात दिली. उपमुख्यमंत्री पवार यांनी विधानसभेत आज निमशासकीय व अनुदानित संस्थांमध्ये कार्यरत शिक्षक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com