नागपूरच्या नेहरू युवा केंद्रातर्फे युवा उत्सवाला उत्‍तम प्रतिसाद

केंद्रीय संचार ब्यूरोच्यावतीने ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ विषयावर छायाचित्र प्रदर्शन

नागपूर :- कुठल्याही क्षेत्रात यश मिळविण्यासाठी कठोर परिश्रम करण्याची गरज असते. सकारात्मक विचार ठेवल्यास यशाची उंची गाठता येते, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय दिव्यांग क्रिकेटपटू गुरूदास राऊत यांनी आज नागपूर येथे केले. नेहरू युवा के्न्द्राने नागपूरच्या इन्स्टिट्युट ऑफ सायंस, येथे आयोजित केलेल्या युवा महोत्सवात ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इन्स्टिट्युट ऑफ सायन्सच्या संचालिक डॉ. अंजली रहाटगांवकर होत्या.या कार्यक्रमाला आंतरराष्ट्रीय योगपटू धनश्री लेकुरवाळे, भारत सरकारच्या कपास विकास निदेशालयाचे संचालक डॉ. ए.एल. वाघमारे, शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख माधवी मार्डीकर, शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ. कुमकुम बोरटकर, केंद्रीय संचार ब्यूरो, नागपूचे प्रभारी सहायक संचालक हंसराज राऊत, नेहरू युवा केंद्र नागपूरचे जिल्हा युवा अधिकारी उदयवीर सिंग, नेहरू युवा केंद्राचे सेवानिवृत्त उपसंचालक शरद साळुंखे, गौरव दलाल उपस्थित होते.

‘’दिव्यांग असल्यामुळे अनेक जण आत्मविश्वास गमावून बसातात, असे सांगून गुरूदास राऊत म्हणाले की, मी दिव्यांग असलो तरी कधीही आत्मविश्वास गमावला नाही. मनात काही तरी करून दाखविण्याची इच्छा होती. समोर अनेक आव्हाने होती, मात्र त्या आव्हानांचा सामना करण्याची जिद्द आई-वडील आणि गुरूजनांकडून मिळाली. त्यामुळेच यश गाठण्यास मदत मिळाली, असे त्यांनी यावेळी सांगितले.

धनश्री लेकुरवाळे म्हणाल्या की, यशाचे शिखर गाठण्यासाठी शारीरिक आरोग्याबरोबर मानसिक आरोग्यही उत्तम ठेवणे गरजेचे आहे. त्याकरीता योग फार उपयुक्‍त ठरतो. आपल्या रोजच्या जीवनात योगासनांना वेळ दिल्यास, आपल्या आवडत्या क्षेत्रात यश मिळविण्यास मदत होते.

याप्रसंगी इतर पाहुण्यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी पाहुण्यांच्या हस्ते विविध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन विद्यार्थी पृथ्वी राऊत यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन जिल्हा युवा अधिकारी उदयवीर सिंग यांनी केले.

या उत्‍सवातील पुरस्‍कार विजेत्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत:

भाषण स्पर्धा

आशुतोष तिवारी (प्रथम)

राशी चिमुरकर (द्वितीय)

विशाल खरचवाल (तृतीय)

कविता स्पर्धा

मोहम्मद शहानवाज खान (प्रथम)

गौरी उडान (द्वितीय)

झशीन बैग अमजद बैग मिर्झा (तृतीय)

मोबाईल छायाचित्र स्पर्धा

समीत मनोहर खापेकर (प्रथम)

अमन भिमटे (द्वितीय)

झशीन बैग अमजद बैग मिर्झा (तृतीय)

चित्रकला स्पर्धा

ओसवाल परमार (प्रथम)

गुंजन शर्मा (द्वितीय)

रिचा सिंग (तृतीय)

नृत्य स्पर्धा

शर्वरी गजघाटे आणि चमू (प्रथम)

अरमान कोरी आणि चमू (द्वितीय)

शरयु जगनाडे आणि चमू (तृतीय)

‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ छायाचित्र प्रदर्शनाला उत्‍तम प्रतिसाद

या युवा उत्सवात माहिती आणि प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूरद्वारे ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ या विषयावर आयोजित केलेल्या छायाचित्र प्रदर्शनाला जिल्ह्यातील युवकांचा आणि विद्यार्थ्यांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला.

यावेळी आंतरराष्ट्रीय योगपटू धनश्री लेकुरवाळे यांच्यासह भारत सरकारच्या कपास विकास निदेशालयाचे संचालक डॉ. ए.एल. वाघमारे, शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख माधवी मार्डीकर, शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ. कुमकुम बोरटकर, नेहरू युवा केंद्राचे सेवानिवृत्त उपसंचालक शरद साळुंखे, गौरव दलाल यांनी भेट देऊन प्रदर्शनाची पाहणी केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आम आदमी पार्टी दक्षिण नागपूर तर्फे श्यामबाग हरपूर उमरेड रोड येथिल स्टेडियम करिता तीव्र आंदोलन.

Fri Mar 17 , 2023
9 वर्ष केंद्रीय मंत्री, 5 वर्षे मुख्यमंत्री तरीही स्टेडियम पूर्ण नाही, गडकरी व फडणवीस यांच्याकरिता शर्मेची बाब – डॉ देवेंद्र वानखडे आरोग्य, क्रीडा आणि शिक्षणाकडे मुद्दाम दुर्लक्ष – डॉ जाफरी 25 वर्षात स्टेडियम पूर्ण होत नाही, नागपूरचे दुर्भाग्य – जगजीत सिंगhttps://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/10/WhatsApp-Video-2024-10-30-at-14.56.12_caaf8c51.mp4  नागपूर :- श्यामबग, ताजबागजवळील स्टेडियम चे बांधकाम गेल्या अनेक वर्षांपासून अर्धवट पडून आहे.जवळच नितिन गडकरी राहतात परंतु या स्टेडियमचा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com