आम आदमी पार्टी दक्षिण नागपूर तर्फे श्यामबाग हरपूर उमरेड रोड येथिल स्टेडियम करिता तीव्र आंदोलन.

9 वर्ष केंद्रीय मंत्री, 5 वर्षे मुख्यमंत्री तरीही स्टेडियम पूर्ण नाही, गडकरी व फडणवीस यांच्याकरिता शर्मेची बाब – डॉ देवेंद्र वानखडे

आरोग्य, क्रीडा आणि शिक्षणाकडे मुद्दाम दुर्लक्ष – डॉ जाफरी

25 वर्षात स्टेडियम पूर्ण होत नाही, नागपूरचे दुर्भाग्य – जगजीत सिंग

 नागपूर :- श्यामबग, ताजबागजवळील स्टेडियम चे बांधकाम गेल्या अनेक वर्षांपासून अर्धवट पडून आहे.जवळच नितिन गडकरी राहतात परंतु या स्टेडियमचा विकास मात्र का करत नाहीत हा प्रश्न निर्माण होत आहे. याकरीता शाहिद जाफरी विदर्भ संयोजक हेल्थ, राष्ट्रीय परिषद सदस्य व प्रभारी अंबरीश सावरकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

याशिवाय मागचे पाच वर्ष देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. आताही ते उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री आहेत, त्यांनी मागच्या आठवड्यात बजेटमध्ये मोठ मोठ्या घोषणा केल्या परंतु त्यांच्या शहरात गेल्या पंचवीस वर्षापासून अर्धवट बांधकाम झालेले हे भव्य स्टेडियम पूर्ण करण्यासाठी कोणताही निधी उपलब्ध करून देण्यात आला नाही. यावरून नागपूरला विकास होतो आहे का?.हा प्रश्न निर्माण होतो. 21 व 22 तारखेला नागपुरात C20 नागरिकांची सभा होत आहे, यामध्ये पण जनतेची फसवणूक केला जात आहे सभा C20 ची आहे परंतु प्रपोगंडा G20 चा केला जात आहे, हे नागपूरकरांची फसवणूक आहे. असे असताना सुद्धा केवळ भिंतांची रंगरंगोटी चालू आहे. नागपुरातील खरा विकास या स्टेडियम रोड वरून आपणास दिसून येतो.

यावेळी विदर्भ संयोजक देवेंद्र वानखडे, महाराष्ट्र कोषाध्यक्ष  जगजीत सिंग, दक्षिण महिला संयोजिका डॉ मेघा वाकोडे, सचिव सचिन पारधी, संघटन मंत्री उमाकांत बनसोड व निखिल मेंढवाडे, कोषाध्यक्ष संजय जीवतोडे, सुषमा कांबळे, सलीम शेख,अब्दुल हाफिज, मोहोम्मद इलियास,राजेश तिवारी,प्रणित कडू,राजू देशमुख,विनायक पाटील उपस्थित होते.

गेल्या काही वर्षात खासदार नागपुरात खासदार क्रीडा महोत्सव आयोजित करतात परंतु त्यांच्या घरापासून अगदी दोन किलोमीटरवर असलेले हे स्टेडियम का पूर्ण केले जात नाही याचे उत्तर गडकरी यांनी नागपूरच्या जनतेला द्यावे.मागील दोन टर्म मध्ये दक्षिण नागपूर मधून बीजेपीचे आमदार निवडून आलेत त्यांनीही या स्टेडियमचा प्रश्न कधीच उचलला नाही.

नागपूर महानगरपालिकेत पंधरा वर्षे बीजेपी चे राज्य होतं तरीही स्टेडियम पूर्ण का झाले नाही याचे उत्तर बीजेपी नेत्यांनी द्यायला पाहिजे.

एकूणच नागपूर शहरात मनपा नी कोणतेही स्टेडियम विकसित केल्याचे दिसून येत नाही. दुसरीकडे गेल्या दहा वर्षात बीजेपी कडून क्रीडा क्षेत्रात कोणतीही भरीव कामगिरी झालेली नाही. खासदार क्रीडा महोत्सव च्या नावावर केवळ नागपुरातील तरुणांच्या डोळ्यात धुळ फेकण्याचे काम गडकरी हे करतात.

आम आदमी पार्टी कडून लियाकत अली,शेर खान,प्रशांत अहिरराव, सरोज राजपूत,शरीफ भाई,गफ्फार खान,शेख गुलाम अहमद,शेख अस्लम,पवन तागाडगे,हिदायात अली,रमा थुल, विनोद काकडे,महेश मामीडवार,दिलीप कोहळे, दिनेश पाटील, आरिफ भाई,जिशन भाई,चंद्रशेखर जाधव उपस्थित होते.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com