संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :-आज नविन संसद भवनच्या पहिल्याच दिवशी ” नारी शक्ती वंदन” च्या बिलाच्या माध्यमातुन लोकसभा तसेच विधानसभेत महिलांकरिता 33% आरक्षणच्या संदर्भातबिल सादर करण्यात आले आहेत. त्या बद्दल पंतप्रधान यांचे बहूजन रिपब्लिकन एकता मंचच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे.
कोणत्याही समाजाची किंवा देशाची प्रगती ही त्या समाजाच्या व देशाच्या महिलांच्या प्रगतीवर अवलंबून असल्याचे मत परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी व्यक्त केले होते. त्या दृष्टीकोनातुन हे महिला आरक्षण बिल हे फार मोठे ऐतिहासिक पाऊल असल्याचे मत ॲड. सुलेखा कुंभारे यांनी व्यक्त केले. ” नारी वंदन” बिला मध्ये अनुसुचित जाती जमातीच्या महिलांना सुध्दा आरक्षणाचा लाभ मिळेल. त्यामुळे या बिलाचे विशेष स्वागत करण्यात येत आहे.
“नारी शक्ती वंदन बिल हे एक मताने पारीत होईल व या बिलाची मर्यादा 15 वर्षां करिता न ठेवता कायम स्वरूपी असावी अशी सुध्दा अपेक्षा ॲड. सुलेखा कुंभारे यांनी व्यक्त केली.