पोरवाल महाविद्यालयात मुलीकरिता रोग निदान शिबिराचे आयोजन

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- कामठीतील सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालयात गुरुवार दिनांक २९ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि एन.यू.एच.एम – यु पी एच सी नगर परिषद कामठी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ या अभियान अंतर्गत महाविद्यालयातील मुली करिता रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. प्रसंगी मंचावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनय चव्हाण, नगर परिषद कामठीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शबनम खाणूनी, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. विनोद शेंडे, महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. निशिता अंबाडे आणि रा.से.यो. समितीचे सदस्य डॉ. दिपक भवसागर उपस्थित होते. प्राचार्य डॉ. चव्हाण यांनी विद्यार्थिनींना या प्रसंगी शिबिरात सहभागी होऊन रोग निदान करून घेण्याचे आवाहन केले. या शिबिरात एकूण २०९ विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. याप्रसंगी डॉ. खानुनी यांच्या चमूने विद्यार्थीनीचे उंची, वजन घेऊन हिमोग्लोबिन, सिकल सेल, याकरीता रक्त तपासणीचे नमुने घेतले व त्याच बरोबर औषधांचे वाटप पण करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अंशिता पिल्ले, पुजा सिंग, आरती सिंग, मोनु जाटवा, रोहित गोटेफोडे, मोहम्मद उजैर, अंकिता अडकणे, अभिषेक चव्हाण, विपुल गजभिये या स्वयंसेवकांनी प्रयत्न केले. शिबिराला उपप्राचार्य डॉ. मनिष चक्रवर्ती, डॉ. रेणू तिवारी, डॉ. स्वप्निल दहात, डॉ. सिध्दार्थ मेश्राम, श्री गिरीश संगेवार, वेंकट, विद्यार्थी आणि शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाअंती रा. से. यों कार्यक्रम अधिकारी डॉ विनोद शेंडे यांनी सर्वांचे आभार मानले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

एनसीसीएल के गोविंद पसारी अध्यक्ष, तरूण निर्बाण सचिव

Thu Sep 29 , 2022
नागपुर :- नागपूर चेंबर ऑफ कॉमर्स की 85वीं वार्षिक आमसभा बुधवार को शाम 4 बजे सेवासदन चौक, सेंटल एवेन्यु स्थित चेंबर के सभागृह में संपन्न हुई। इस मौके पर सभासदों की भारी उपस्थिति में चुनाव संपन्न हुए। मुख्य चुनाव अधिकारी एड.आलोक डागा और चुनाव अधिकारी सीए  संदीप जोतवानी की निगरानी में चुनाव संपन्न हुए इस चुनाव में गोविंद पसारी अध्यक्ष, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com