नागपूर :- परिवर्तन शील बुध्दिष्ट बहुउद्देशीय संस्थेच्या अंतर्गत संकल्प बाल वृद्ध सेवा आश्रम तक्षशिला नगर, नारी रोड, धम्म मशाल बुध्द विहारा जवळ शुभारंभ करण्यात आला असून यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी पालकमंत्री नितिन राऊत यांचे शुभहस्ते मंगळवारी 23 एप्रिल रोजी, उद्घाटन करण्यात आले. वृध्दाश्रम काळाची गरज आहे आणि हिच गरज भागविण्याची समाजाची जवाबदारी आहे. परंतु आज काळ बदलला आहेत त्याच बरोबर बदलली संस्कृति, परंपरा आणि नातीही आणि हाच संकल्प मनात ठेवून अध्यक्षीय भाषणात संगीता चंद्रिकापूरे पाटिल यांनी सांगीतले की ज्या लाचारीमुळे कुठेही जीवनयापन करीत असतात अशा निराधार महिलाना आधार देणे आणि जिवनाच्या शेवटच्या क्षणी आनंदित सुखी जीवन जगणे हे आपल्या समाजाचे कर्त्तव्य आहे आणि हेच ध्येय मनात ठेवून संकल्प बाल वृद्ध सेवा आश्रम चा शुभारंभ करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन सुनीता चांदेकर, संगीता चंद्रिकापूरे पाटिल, अनिता राऊत, सविता बोरकर तसेच या शुभारंभाला उपस्थित असलेले प्रो. टि.जी.गेडाम, विज्ञा देशभ्रतार, वैशाली तभाणे, सुरेश उईके, विजया वालदे, महानंदा इलमकर, गंगा, वंदना टेंभुणे, भारती चांदेकर, अनिता तिरपुडे, अरूण हट्टेवार, अनिल पुरी, निलेश चांदेकर, राजन बोरकर आणि मोठया संख्येने कार्यकर्ताची उपस्थिति होती. तसेच याप्रसंगी वृद्धांना संस्थेच्या वतीने साड़या वाटप करण्यात आले.
संकल्प वृद्ध सेवा आश्रमाचे थाटात उद्घाटन
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com