– नागपूर मुलींचा संघ विजयी
नागपूर :- शिवाजी नगर जिमखाना येथे सुरू असलेल्या महा बास्केटबॉल संघटने द्वारा आयोजित राज्य युवा अजिंक्यपद स्पर्धेचे औपचारिक उद्धघाटन पार पडले. दि: ११ ते १४ नोव्हेंबर दरम्यान घेण्यात येणाऱ्या बास्केटबॉल स्पर्धेचे उद्धघाटन आनंद संचेती अध्यक्ष महा बास्केटबॉल संघटना यांचे हस्ते पल्लवी धात्राक जिल्हा क्रीडा अधिकारी नागपूर यांचे प्रमुख उपस्थितीत झाले. उद्धघाटन प्रसंगी मंचावर धनंजय वेळूकर माजी अध्यक्ष महा बास्केटबॉल, जयंत देशमुख कोषाध्यक्ष महा बास्केटबॉल, राकेश तिवारी, मुद्रा अग्रवाल व स्वप्नील बनसोड, महेश उपदेव, मोहन दाढी, सूर्यकांत इलमे, मोहम्मद उस्मान इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना व आभार प्रदर्शन शिव छत्रपती पुरस्कार विजेते व महा बास्केटबॉल संघटनेचे सचिव शत्रुघ्न गोखले यांनी केले.
उदघाटनाच्या सामन्यात नागपूरच्या मुलींच्या संघाने अहमदनगर संघाचा 39 विरुद्ध 9 अश्या गुनाच्या फरकाने पराभव केला. नागपूर तर्फे रिद्धी बोरकर 13 गुण व वेदिका मोहता 11 गुण यांनी मोलाची कामगिरी केली.