संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
पारशीवनी:- पारशीवनी तालु्यातील पालोरा येथे बाल गणेश उत्सव मंडळ कुणबी मोहल्ला चे वतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा हाडपक्या गणपती उत्सव दैनंदिन विविध धार्मिक कार्यक्रम घेऊन साजरा करण्यात आला.
आज २३ सप्टेंबर ला सकाळी दहा वाजल्यापासून गणपतीचे विसर्जन प्रसंगी भाविकांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली. गावात विविध मार्गाने मिरवणूक काढून डी.जे.ढोल ताशांच्या गजरात तल्लीन होऊन महिला व पुरुष गुलालाची उधळण करीत आनंद उत्सव साजरा करण्यात आला. व त्यानंतर पेच नदी घाटावर गणपती चे विसर्जन करण्यात आले.या मंडळाचे अध्यक्ष प्रशांत टेकाम, उपाधेक्ष आकाश अंबाडारे,सचिव कुणाल वाळके,राजू वाळके,जितू कुभलकर,कैलाश कुहिटे, स्वराज कुहीटे,ऋषी गोरले,चेतन गोरले,चेतन हिरतकर,पंकज भारती,कविता वाळके,सुनंदा कुहीटे,रंजना गोरले,इंदिरा भोयर,प्रमिला अंबादरे, भुमिका पारवे,रेखा राऊत इत्यादी सह गावकऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.
या विसर्जन प्रसंगी पारशीवनी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल सोनवणे यांच्या मार्गदर्शनात दत्ता बगमारे, आर.एस. दखने,शुभम गयगये यांनी चोख बंदोबस्त लावण्यात आला होता.