शासन आपल्या दारी -“सुविधा बांधकाम कामगारांसाठी

महाराष्ट्र शासन शेतकरी, कामगार, महिला, विद्यार्थी, तरुण वर्ग यांना केंद्र बिंदू मानून अनेक योजना राबवित असते. या योजना लोकांपर्यंत पोहचवून त्यांना त्याचा लाभ मिळून देण्यासाठी राज्य शासनाने शासन आपल्या दारी हा उपक्रम सुरु केला आहे. या अभियानांतर्गत आज आपण जाणून घेऊ बांधकाम कामगारांसाठी असलेल्या विविध योजना व सुविधांची माहिती….

बांधकाम कामगारांसाठी राज्य शासनाने सामाजिक सुरक्षा, शैक्षणिक सुविधा, आरोग्य विषयक सुविधा, आर्थिक सहाय्य, आदी विविध सुविधा देत आहे. या सुविधांमुळे बांधकाम कामगारांचे जीवनमान सुसह्य होण्यास मदत होत आहे.

१) सामाजिक सुरक्षा-

• विवाहाच्या खर्चाची प्रतिपूर्ती रुपये ३० हजार

• मध्यान्ह भोजन- कामाच्या ठिकाणी दुपारी पौष्टिक आहार

• प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना

• व्यक्तिमत्व विकास पुस्तक संचाचे वाटप

• अवजारे खरेदी करिता ५ हजार रुपये मदत

• सुरक्षा संच पुरविणे अत्यावश्यक संच पुरविणे

आवश्यक कागदपत्रे -सर्व योजनांकरिता आवश्यक

• अर्जदाराचा फोटो,

• आधार कार्ड,

• रेशन कार्ड.

• बँक पासबुक झेरॉक्स

• बांधकाम कामगार नोंदणी प्रमाणपत्र

सामाजिक सुरक्षा योजनेकरिता-

• शपथपत्र & हमीपत्र (योजनेनिहाय)

• विवाह नोंदणी प्रमाणपत्र (विवाह खर्च प्रतिपूर्ती योजना)

(२) शैक्षणिक सहाय्य-

या योजनेंतर्गत सर्व लाभ फक्त नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पहिल्या दोन मुलांसाठी लागू आहेत.

• इयत्ता पहिली ते सातवी प्रतिवर्ष रु. २ हजार ५०० आणि इ. आठवी ते दहावी- प्रतिवर्ष रु. ५ हजार.

• इयत्ता दहावी व बारावीमध्ये ५०% पेक्षा अधिक गुण प्राप्त झाल्यास रु.१० हजार.

• इयत्ता अकरावी व बारावी च्या शिक्षणासाठी प्रतिवर्ष रु.१० हजार.

• पदवी अभ्यासक्रम शिक्षणासाठी प्रतिवर्ष रु. २०हजार.

• MSCIT शिक्षण मोफत

• वैद्यकीय शिक्षणाकरिता प्रतिवर्ष रु.१ लाख व अभियांत्रिकी शिक्षणाकरिता- रु.६० हजार.

• शासनमान्य पदविकेसाठी प्रतिवर्ष रु. २० हजार व पदव्युत्तर पदवीसाठी प्रतिवर्ष रु.२५ हजार.

शैक्षणिक योजनेकरिता कागदपत्रे

• पाल्याचे शाळेचे ओळखपत्र

• ७५% हजेरीचा शाळेचा दाखला

• किमान ५०% गुण मिळाल्याची गुणपत्रिका.

• दहावी व अकरावी ची गुणपत्रिका मागील

• शैक्षणिक इयत्तेत उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र (वैद्यकीय, अभियांत्रिकी, पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी)

• MSCIT उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र

३) आरोग्यविषयक –

• नैसर्गिक प्रसूतीसाठी रु. १५ हजार व शस्त्रक्रियाद्वारे प्रसूतीसाठी रु.२० हजार.

• गंभीर आजाराच्या उपचारार्थ रु.१ लाख.

• ७५% पेक्षा जास्त अपंगत्व आल्यास रु.२ लाख.

• व्यसनमुक्ती केंद्रातील उपचाराकरिता रु.६ हजार.

आरोग्य विषयक योजनेसाठी कागदपत्रे

• प्रसूतीचे प्रमाणपत्र (प्रसूती साहाय्य योजना)

• गंभीर आजार असल्याचे प्रमाणपत्र (उपचारार्थ मदत करिता)

• ७५% अपंगत्व असल्याचे प्रमाणपत्र (आर्थिक मदत करिता)

• व्यसनमुक्ती केंद्रातून उपचार घेत असल्याचे प्रमाणपत्र

४) आर्थिक

• कामगाराचा कामावर असताना मृत्यू झाल्यास रु. ५ लाख (कायदेशीर वारसास मदत).

• कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास रु. २ लाख (कायदेशीर वारसास मदत)

• अटल बांधकाम कामगार आवास योजना- रु. २ लाख अर्थसहाय्य

• कामगाराचा ५० ते ६० वर्ष वयोगटात मृत्यू झाल्यास अंत्यविधीसाठी रु. १० हजार मदत

• कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नीस अथवा पतीस प्रतिवर्ष रु. २४ हजार (५ वर्ष मदत)

• गंभीर आजाराच्या उपचारार्थ रु.१ लाख.

आर्थिक विषयक योजनेसाठी कागदपत्रे

• मृत्यू दाखला व ठेकेदाराचे कामावर असल्याचे प्रमाणपत्र

• प्रधानमंत्री आवास योजनेत पात्र असल्याचे प्रमाणपत्र

अर्ज कुठे करावा –

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ जिल्हा कार्यालयात किंवा https://mahabocw.in/mr/ या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करता येईल, असे आवाहन सहायक कामगार आयुक्त भंडारा राजदीप धूर्वे यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

शिस्तीचे पालन केल्यास मिळतो सन्मान - प्र-कुलगुरू

Thu Nov 2 , 2023
– विद्यापीठात शिक्षक, अधिकारी, कर्मचारी निरोप समारंभ नागपूर :- कर्तव्य बजावत असताना शिस्तीचे पालन केल्यास सन्मान मिळत असल्याचे प्रतिपादन प्र- कुलगुरु डॉ. संजय दुधे यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झालेले शिक्षक, अधिकारी, कर्मचाऱ्यांचा निरोप समारंभ जमनालाल बजाज प्रशासकीय भवनातील सभागृहात मंगळवार, दिनांक ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी पार पडला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्र-कुलगुरु डॉ. दुधे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com