ठाणे :- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज स्वस्तिक मैदान, घोडबंदर रोड, ठाणे येथे आयोजित श्रीमद भागवत कथा ज्ञान महायज्ञ व संत संमेलनाला भेट देऊन कथा श्रवणाचा लाभ घेतला. यावेळी राज्यपालांनी कथाकार देवकीनंदन ठाकूर (वृंदावन) यांना वंदन केले व आरती केली.
भागवत कथा यज्ञाचे आयोजन श्याम सरकार व श्रीमद भागवत ज्ञान यज्ञ समिती, ठाणे यांनी केले होते.
यावेळी विधान परिषद सदस्य निरंजन डावखरे, समितीच्या पदाधिकारी श्वेता शालिनी व पवन कुमार शर्मा तसेच शेकडो भाविक उपस्थित होते.