राज्यपालांची छेडानगर सुब्रमण्यम समाज मंदिराला भेट; चंडी महायज्ञात दिली पूर्णाहुती; पिठाधिपती विजयेंद्र सरस्वती यांचे संबोधन 

मुंबई :- महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी छेडानगर,चेंबूर, मुंबई येथील दक्षिण भारतीयांच्या जुन्या श्री सुब्रह्मण्य समाज मंदिराला सोमवारी (दि. 12) भेट दिली.

अमृत महोत्सवी वर्ष साजरे करीत असलेल्या सुब्रह्मण्य समाजाच्या श्री मुरुगन (कार्तिक स्वामी) मंदिरात चंडी महायज्ञ, लक्ष्मीनारायण हृदय पारायण तसेच संपूर्ण चतुर्वेद पारायणाचे समापन राज्यपाल राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत झाले.

भारतात लोककल्याणासाठी आणि शांततेसाठी वेळोवेळी महायज्ञ व अनुष्ठानाचे आयोजन होत आले आहे. त्यामुळे देशात शांती व सौहार्द निर्माण होऊन देश सुजलाम सुफलाम राहण्यास मदत झाली आहे, असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

यावेळी राज्यपालांनी सुब्रह्मण्य समाज मंदिरात वल्ली – देवसेना सहित श्री सुब्रह्मण्य स्वामी, महागणपती, अय्यप्पन, गुरुवायुरप्पन, दुर्गा देवी, शिव पार्वती आणि नवग्रहांचे दर्शन घेतले तसेच चंडी महायज्ञात पूर्णाहुती दिली.

महाराष्ट्र ही संतांची तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे. कांची कामकोटी पिठाचे महास्वामी शंकराचार्य तसेच जयेंद्र स्वामी यांचे महाराष्ट्रावर विशेष प्रेम राहिले आहे असे पिठाचे विद्यमान पिठाधिपती विजयेंद्र सरस्वती यांनी दृकश्राव्य माध्यमातून संबोधित करताना सांगितले.

छेडानगर येथील मंदिरात आजवर चारवेळा पूर्ण कुंभाभिषेक झाल्यामुळे हे मंदिर विशेष महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी सुब्रमण्यम समाजाचे सचिव पी. सुब्रमण्यम, डी. विजया भानू गणपतीगल, श्रुती स्मृती सेवा ट्रस्ट व श्री सुब्रह्मण्य समाजाचे पदाधिकारी व भाविक उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना 2024 चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर

Wed Aug 14 , 2024
– ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार संजयजी महाराज पाचपोर यांना जाहीर – आरती अंकलीकर-टिकेकर, प्रकाश बुध्दीसागर, शुभदा दादरकर यांचाही होणार पुरस्काराने गौरव – यावर्षीचे राज्य सांस्कृतिक पुरस्कारही जाहीर – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून पुरस्कारार्थींचे अभिनंदन मुंबई :- सांस्कृतिक कार्य विभागामार्फत प्रदान करण्यात येणारे विविध पुरस्कार जाहीर आज करण्यात आले. सन २०२४ च्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com