राज्यपालांच्या हस्ते देशभरातील ५० युवा कलाकारांना डॉ एम एस सुब्बलक्ष्मी शिष्यवृत्ती प्रदान

भारतीय शास्त्रीय संगीत केवळ मनोरंजन नाही तर आत्मानुभूती  : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

भारतीय शास्त्रीय संगीत केवळ मनोरंजन किंवा करमणुकीचे साधन नसून ती आत्मानुभूती असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे काढले.

श्री षण्मुखानंद ललित कला व संगीत सभेतर्फे आयोजित कार्यक्रमात शनिवार (दि. ११) राज्यपालांच्या हस्ते शास्त्रीय संगीत क्षेत्रातील देशभरातील ५० युवा कलाकारांना श्री षण्मुखानंद एम एस सुब्बलक्ष्मी शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आल्या, त्यावेळी राज्यपाल बोलत होते.

यावेळी संगीत क्षेत्रातील प्रदीर्घ सेवेबद्दल राज्यपालांच्या हस्ते चेन्नई येथील दिव्यध्वनी स्कुल ऑफ कर्नाटक म्युझिकच्या संस्थापिका श्रीमती सीता नारायणन यांना सुब्बलक्ष्मी संगीत प्राचार्य पुरस्कार प्रदान करण्यात आला.

भारतीय संगीतामध्ये स्वर्गीय अनुभूती देण्याचे दैवी सामर्थ्य आहे असे सांगून युवा संगीतकारांनी डॉ सुब्बलक्ष्मी यांच्या नावाने मिळालेली शिष्यवृत्ती एक जबाबदारी आहे याची जाणीव ठेवून कठोर परिश्रम व अभ्यासाच्या माध्यमातून उत्तम संगीतकार व्हावे, असे राज्यपालांनी सांगितले.

षण्मुखानंद सभा युवा कलाकारांना शिष्यवृत्ती प्रदान करून देशाच्या संस्कृती, संगीत व कला संवर्धनाचे महत्वपूर्ण काम करीत असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

यावेळी षण्मुखानंद सभेचे अध्यक्ष डॉ व्ही शंकर यांनी प्रास्ताविक केले तर उपाध्यक्ष डॉ व्ही रंगराज यांनी आभारप्रदर्शन केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

Maharashtra Governor presents Dr M S Subbulakshmi Fellowships to 50 young musicians

Mon Dec 13 , 2021
-Divya Dhwani founder Seetha Narayanan presented Sangeetha Pracharya Award -Indian Music is not just recreation; it is realization: Governor Bhagat Singh Koshyari Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari presented the Sri Shanmukhananda Bharat Ratna Dr M S Subbulakshmi Sangeetha Pracharya Award to founder of Divyadhwani Music School Chennai Seetha Narayanan in Mumbai on Saturday (11th Dec). The Governor also presented the Sri […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com