राज्यपाल, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे अतिरेकी हल्ल्यातील पोलीस हुतात्म्यांना अभिवादन

मुंबई :- राज्यपाल रमेश बैस यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेसह मुंबई पोलीस आयुक्त कार्यालय परिसरातील पोलीस हुतात्मा स्मारक येथे पंधरा वर्षांपूर्वी अतिरेकी हल्ल्यात हौतात्म्य प्राप्त झालेल्या पोलीस अधिकारी व जवानांना पुष्पचक्र वाहून आपली श्रद्धांजली वाहिली.

भावपूर्ण वातावरणात झालेल्या या कार्यक्रमात पोलीस बँड पथकाने ‘सलामी शस्त्र’ व ‘बिगुलर लास्ट पोस्ट’ वाजविले. यावेळी सर्व मान्यवरांनी तसेच गणवेशातील अधिकारी व पोलीस जवानांनी हुतात्म्यांना सलामी दिली.

हुतात्म्यांना पुष्पचक्र वाहिल्यानंतर राज्यपालांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासह हुतात्मा पोलीस कुटुंबातील सदस्यांची भेट घेतली.

यावेळी मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, अपर मुख्य सचिव (गृह) सुजाता सौनिक, राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ व मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी देखील हुतात्म्यांना अभिवादन केले.

यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच सेवा निवृत्त पोलीस अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन मुंबई पोलिसांतर्फे करण्यात आले होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

MEDICAL OUTREACH SURVEY FOR VETERANS

Sun Nov 26 , 2023
Nagpur :-Medical outreach survey was carried out under the directions of Maj Gen SK Vidyarthi, GOC, UM & G Sub Area. A special team of MH Kamptee headed by Col PK Nayak, Commanding Officer, MH Kamptee visited ECHS Polyclinics of Bhuldhana, Akola, Amravati and Wardha to asses the standard of Medical Services rendered to the veterans. The team interacted with […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com