अमरदिप बडगे, प्रतिनिधी
– पीडितेचा बयानावरुण स्केच केला तयार
गोंदिया – जिल्ह्यात 35 वर्षीय महिलेवर अत्याचार प्रकरण घडले असून एकूण 3 आरोपिने महिलेवर दोन वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार केल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी भंडारा पोलिसांनी लुखा उर्फ अमित सार्वे व मोहम्मद एजाज अंसारी याला अटक करत गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव पोलिसांना गुन्हा व आरोपी वर्ग केले होते. या प्रकरणी गोरेगाव पोलिसांना तीसरा आरोपी हवा असून हे प्रकरण आता SIT तपासात आहे. दरम्यान आज SIT कडून पीडितेचा बयानावरुण पहिल्या आरोपी स्केच तयार करण्यात आला आहे . यात आरोपिचे वय 30 ते 40 वर्षचे असुन दिसायला सावला रंगाचा व मध्यम बांधा, केस काळे , हलकी दाढ़ी, डाव्या हातात जर्मनच्या कड़ा, डाव्या हाताच्या बोटामध्ये दोन-तीन अंगठ्या, पांढरा रंगाचा शर्ट, काळ्या रंगाचा फुलपैंट, काळ्या रंगाची सैंडेल टाइप चप्पल,बोलरण्यात आवाज आदि वर्णन करण्यात आला आहे.