यवतमाळ येथे ‘इफ्को सागरिका, सहकारी विपणन आणि व्यवस्थापन’ विषयावर खरीपपूर्व संवेदीकरण प्रशिक्षण कार्यक्रमाला शेतकरी भागधारकांचा उत्तम प्रतिसाद

यवतमाळ :- इफ्को, आयसीएआर, कृषी विज्ञान केंद्र, एटीएमए आणि VAMNICOM या संस्थांच्या वतीने शुक्रवारी (14 जून) यवतमाळ येथे सहकारी भागधारकांसाठी इफ्को सागरिका, सहकारी विपणन आणि व्यवस्थापन या विषयावर खरीपपूर्व संवेदीकरण प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथील सहकारी खरीप विक्री समिती लिमिटेडच्या सहकारी पणन संस्थांचे सदस्य, शेतकरी, शेतकरी उत्पादक संघटना, या क्षेत्रात योगदान देणारे विक्रेते तसेच कृषी व्यवसाय आणि सहकारी परिसंस्थेचे संबंधित भागधारक यांच्यासाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

पांढरकवडा येथील कोंढारा भागात असणाऱ्या डॉ. आप्पासाहेब पवार कृषी तंत्रविद्यानिकेतन महाविद्यालयात आयोजित या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून यवतमाळचे उपजिल्हाधिकारी सुहास गाडे, जिल्हा कृषी अधिकारी प्रमोद लहाळे, जिल्हा सहकारी संस्थेचे उपनिबंधक नानासाहेब चव्हाण, कृषी विज्ञान केंद्राचे संचालक, शास्त्रज्ञ सुरेश नेमाडे, संचालक, शास्त्रज्ञ, कृषी अभियांत्रिकी शास्त्रज्ञ राहुल चव्हाण, सहकारी खरेदी विक्री समितीचे संचालक जितेंद्रसिंग गोरामनगर (कोंगरेकर), VAMNICOM येथील सहायक प्राध्यापक डॉ. अमित बोरकर, व्यवस्थापक महेश अक्केवार, इफको प्रादेशिक अधिकारी संतोष फलटणकर आदी मान्यवर उपस्थित होते.

तर, सुमारे 300 सहकारी संस्था, प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्था, शेतकरी भागधारक प्रशिक्षण कार्यक्रमास उपस्थित होते. सहभागींनी इफ्को सागरिका, ड्रोन व्यवस्थापन, कापूस, तूर आणि संबंधित पिकांवर लक्ष केंद्रित करणा-या खरीपपूर्व पीक व्यवस्थापन या एकदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ घेतला.

कृषी व्यवसायाचे उपक्रम शाश्वत आणि प्रभावी मार्गाने पार पाडण्यासाठी सहकारांमार्फत माहिती व्यवस्थापन, तांत्रिक उपाययोजना आणि संसाधन व्यवस्थापनाबाबत भागधारकांना संवेदनशील करणे हा या प्रशिक्षण कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला सहकारी विपणन संघाचे व्यवस्थापक महेश आक्केवार आणि अध्यक्ष जितेंद्रसिंग गोरामनगर (कोंगरेकर) यांनी प्रास्ताविक स्वागतपर भाषणात सहकारी भागधारकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमाची प्रगती आणि गरज स्पष्ट केली.

उपजिल्हाधिकारी सुहास गाडे यांनी महाराष्ट्र आणि भारतातील सहकार आणि कृषी व्यवसाय वाढीसाठी पीक वैविध्य, तांत्रिक उपाययोजना आणि त्यांचा अवलंब, साधनसामुग्री व्यवस्थापन यासाठी सहकारी संस्थांनी पुढे येण्याची गरज असल्याचे मत मांडले.

ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सुरेश नेमाडे यांनी खरीप पिकांसाठी पोषक द्रव्य व्यवस्थापन आणि ड्रोन तंत्रज्ञानाद्वारे त्याचा वापर यावर प्रकाश टाकला. यवतमाळ जिल्ह्य़ात, जेथे शेतकऱ्यांकडे सरासरी जमीन 15 एकर आहे अशा भागात यापुढे मजूर उपलब्ध नसण्याच्या संकटांवर मात करण्यासाठी ड्रोन तंत्रज्ञानाच्या वापरावर त्यांनी भर दिला. महाराष्ट्रातील यवतमाळसारख्या कापूस पट्टा प्रदेशात ड्रोनद्वारे व्यवस्थापन आणि इफको सागरिकाचा वापर यामुळे उत्पादकता आणि मातीचे आरोग्य चांगल्या स्थितीत ठेवण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.

राहुल चव्हाण यांनी ड्रोन तंत्राबाबत मूलभूत माहिती तसेच इफ्को सागरिकाच्या ड्रोन फोलियर ऍप्लिकेशनच्या तांत्रिक उपाययोजनेसाठी ड्रोन तांत्रिक ज्ञान आणि अर्थशास्त्राबाबत माहिती दिली.

डॉ. महेश कदम यांनी तंत्रज्ञानाचा अवलंब आणि सामाजिक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी माहिती व्यवस्थापन, सहकारी भूमिकेसाठी क्षमता निर्माण आणि प्रशिक्षण दृष्टीकोन यांचे महत्त्व सांगितले. यामुळे तरुणांना सहकारी परिसंस्थेद्वारे तंत्रज्ञानाचा प्रसार आणि सहकारी उत्पादनांचा प्रचार करता येईल, असे ते म्हणाले.

उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी इफ्को सागरिका, इफ्को बाजार उपक्रमांद्वारे माहिती व्यवस्थापन, सहकारी विपणन या उपक्रमांबाबत सविस्तर माहिती दिली.

इफ्को बाजार आणि इफ्को सागरिका विपणन व्यवस्थापन संस्थेचे विभागीय व्यवस्थापक संजीव मिश्रा यांनी सागरिकाचा वापर तसेच त्यांची पीक उत्पादकता आणि माती आरोग्यासाठीची महत्वपूर्ण भूमिका याबद्दल तपशीलवार सादरीकरण केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

खोल समुद्रात स्वतःची शोध मोहीम राबवणारा भारत हा जगातील सहावा देश ठरणार - केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंह

Tue Jun 18 , 2024
नवी दिल्ली :- “भारत हा स्वतःचे ‘डीप सी मिशन’, अर्थात खोल समुद्रातील मोहीम राबवणारा जगातील सहावा देश ठरणार आहे’,असे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान (स्वतंत्र प्रभार), पृथ्वी विज्ञान (स्वतंत्र प्रभार), पंतप्रधान कार्यालय, अणु ऊर्जा विभाग आणि अंतराळ विभाग, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्ती वेतन राज्यमंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांनी शनिवारी नवी दिल्ली येथे सांगितले. भूविज्ञान मंत्रालयाच्या 100 दिवसांच्या कृती आराखड्यावर चर्चा करण्यासाठी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com