युवा पिढीच्या स्वप्नांना पंख देणारी आनंदाची बातमी – आमदार विनोद अग्रवाल

MPSC करणार 8 हजार पदांवर ऐतिहासिक मेगाभरती

गोंदिया :- महाराष्ट्रातील युवा पिढीच्या स्वप्नांना पंख देणारी ही मोठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारी पदभरतीची तयारी करणाऱ्या युवक-युवतींसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC) आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या भरतीची घोषणा करण्यात आली असून विविध संवर्गातील 8 हजार 169 पदे भरली जाणार आहेत.

महाराष्ट्राच्या इतिहासात आजवर 8 हजार इतक्या मोठ्या संख्येने पदभरती होण्याची ही पहिलीच वेळ आहे. तसेच लिपिक पदे आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरली जात आहेत. लिपिक पदभरतीत गैरप्रकाराच्या बातम्या येत असत; पण आता नक्कीच प्रामाणिक आणि होतकरू उमेदवार नोकरीस लागतील. हे सर्व विद्यार्थी मित्रांचे यश आहे. या सर्व उमेदवारांचे अभिनंदन आणि परीक्षेतील यशासाठी शुभेच्छा!

आमदार विनोद अग्रवाल

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

स्वच्छ सर्वेक्षणात दर्जा उंचावण्यासाठी समन्वयाने कार्य करा मनपा आयुक्तांचे अधिकारी, कर्मचा-यांना आवाहन : क्षमता बांधणी कार्यशाळा

Sat Jan 21 , 2023
नागपूर : नागपूर शहर स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ बनवून स्वच्छ सर्वेक्षण २०२३मध्ये दर्जा उंचावण्याच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिकेद्वारे वाटचाल सुरू झालेली आहे. स्वच्छतेचे कार्य हे कुठलेही विभाग अथवा अधिकारी यांच्यापूरते मर्यादित नसून ते सर्व विभाग आणि अधिकारी, कर्मचा-यांच्या समन्वयाने आणखी उंचावणारे आहे. सर्वांच्या समन्वयाने नागपूर शहराचा चेहरामोहरा बदलण्यात वेळ लागणार नाही. त्यामुळे स्वच्छ सर्वेक्षणात दर्जा उंचावण्यासाठी समन्वयाने कार्य करा, असे आवाहन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com