स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेत सहभागी होऊन आपला व आपल्या गावाचा नाव गौरवनित करावा – सरपंच मोरेश्वर कापसे

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी

कामठी –  कामठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेत सहभागी होऊन आपला व आपल्या गावाचं नाव लौकिक करण्याचे आव्हान खैरी ग्रामपंचायतचे सरपंच व कामठी तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष मोरेश्वर कापसे यांनी खैरी ग्रामपंचायत च्या वतीने आयोजित दहावी व बारावी बोर्ड परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरव सोहळ्यात मार्गदर्शन करताना व्यक्त केले खैरी ग्रामपंचायत च्या वतीने आयोजित दहावी ,बारावी बोर्ड परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा कार्यक्रमाची सुरुवात सरपंच मोरेश्वर कापसे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आले यावेळी कामठी पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी प्रदीप गायगोले, विस्तार अधिकारी गोपीचंद कातोरे,कश्यप सावरकर, शशिकांत डाखोरे, उपसरपंच विना रघाटाटे,ग्रामपंचायत सदस्य नथू ठाकरे ,दिलीप ठाकरे, हृदय सोनवणे ,दिनेश मानकर, विजया शेंडे, प्रीती मानकर ,सुजाता डोंगरे ,माया कानफाडे ,ग्रामविकास अधिकारी नीलकंठ देवगडे उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान पाहुण्यांच्या हस्ते दहावी –बारावी बोर्ड परीक्षेतील प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला कार्यक्रमात प्रमुख अतिथीनी मार्गदर्शन करताना मनहाले ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेत सहभागी होऊन आपला व आपल्या गावाचं नाव गौरवणित करण्याचे आव्हान केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्राम विकास अधिकारी नीलकंठ देवगडे यांनी केले संचालन शुभम बरगड व आभार प्रदर्शन नितेश मानकर यांनी मानले कार्यक्रमाला मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.

Email Us for News or Artical - [email protected]
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!