गोंडवाना गणतंत्र पार्टीनीं उदय नगर चौकात बिरसा मुंडा जयंती मोठ्या उत्साहात केली साजरी 

आदिवासी समाज आजही अंधारातच ..

नागपूर :- आदिवासी समाजाचे क्रांतिकारक ओळखले जाणारे बिरसा मुंडा आदिवासी समाजक्रांतीचे जनक व आद्य क्रांतिकारक अपनी धरती, अपना राज, जल, जंगल, जमिनीसाठी इंग्रजाविरोधात विद्रोह केला. क्रांतिकारक बिरसा मुंडा एक भारतीय क्रांतिकारक होते बिरसा मुंडा यांनी समाजासाठी स्वातंत्र्य लढ्यासाठी महत्वपूर्ण देशासाठी योगदान दिले म्हणून देशात दरवर्षी १५ नोव्हेंबर ला मोठ्या जल्लोषात जयंती साजरी करण्यात आली. बिरसा मुंडा यांच्या १४७ व्या जयंती निमित्ताने गोंडवाना गणतंत्र पार्टीचे समस्त पदाधिकारी, आदिवासी नगर, उदय नगर, गोंडराजे विरेंद्र शहा ऊईके, राजे वासुदेव शहा टेकाम राष्ट्रीय उपाध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व पुष्पांजली अर्पित करून अभिवादन करण्यात आले. गोंडराजे विरेंद्र शहा ऊईके यांच्या हस्ते गोंडी सप्तरंगी ध्वजारोहण करण्यात आले. बिरसा मुंडा यांच्या जीवनकार्याचा उद्बोधन कार्यक्रम आर.डी.आतराम यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी मंचावर तिरु.सुधाकर आतराम महासचिव गोंगपा, राजेश इरपाते युवा प्रदेशाध्यक्ष, दिनेश सिडाम शहर अध्यक्ष, गंगा टेकाम जिल्हा अध्यक्षा, शिला मर्सकोल्हे, शितल मडावी, सुनंदा घोडाम, मुक्ता गेडाम, मुक्ता काटोले, विजय काटोले, प्रविण मडावी युवा उपाध्यक्ष, सौरभ मसराम जिल्हा युवा उपाध्यक्ष, राजेश पेंदाम शहर संघटक, सेवाराम टेकाम (गोंगपा) मनोज धुर्वे (गोंगपा) व कार्यक्रमात सहभागी समाज उपस्थित होते. बिरसा मुंडा यांच्या गौरवशाली जीवनाला त्यांचे कार्य आत्मसात करणे फार आवश्यक आहे. जरी देशात ७५ वा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला असला तरी आजही आदिवासी समाज अंधारात आहे. आताही त्यांच्यावर जुलमी अत्याचार होत आहे. आणि हे अत्याचार थांबविण्यासाठी आपल्याला पुन्हा पिवळ्या क्रांतीमधून व पिवळ्या क्रांतीच्या माध्यमातून चळवळ करुन थांबवायचे आहे. असे जिल्हाअध्यक्षांनी समाजाला आवाहन केले आहे. आदिवासी समाज हे देशाचे मूल निवासी आहेच व त्यांचे मुलभुत अधिकार त्यांना मिळालेच पाहीजे. असे सरकारला म्हटले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्रिष्णा सरोते, अशोक पोयाम, गणेश परतेकी, रवि घोडाम, विरेंद्र ऊईके, इश्वर नैताम, शैलेश कोटनायके, नाना नैताम, राहुल कोवे, प्रशांत उईके, वैभव मसराम, शुभम मसराम, सचिन पोयाम, सुरज कुडमेथे, ऊईके, विक्की घोडाम, जिवन घोडाम, विजय काटोले, बेबी  कोवे, सत्यफुला ऊईके, आशा कुडमेथे, रंजना सरोते, अहिल्या आतराम, अल्का आतराम, संगिता परतीके, सुनंदा घोडाम, शितल मसराम, सरस्वती भलावी, नलिनी निंबाळकर, मुक्ता काटोले, मंगला धुर्वे आयोजक आदिवासी नगर गोंगपा व आदींनी परिश्रम घेतले. संचालन हर्षल सिरसाम यांनी केले व प्रास्ताविक विजय आतराम व आभार हिमांशु धुर्वे यांनी मानले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

श्वान पाळण्यासाठी मनपात नोंदणी बंधनकारक

Sat Nov 19 , 2022
तीन महिन्यात सर्व श्वान मालकांनी नोंदणी करण्याची सूचना नागपूर : नागपूर महानगरपालिका क्षेत्रात श्वान पाळणा-यांना आता मनपामध्ये नोंदणी करणे बंधनकारक आहे. महापालिका हद्दीत राहणा-या सर्व श्वान मालकांना तीन महिन्याच्या आत अर्थात ९० दिवसांमध्ये नोंदणी करणे अनिवार्य आहे, अशी सूचना मनपाचे उपायुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. गजेंद्र महल्ले यांनी केली आहे. श्वान नोंदणीसाठी मनपाद्वारे सर्व झोन कार्यालयामध्ये व्यवस्था करण्यात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com