नागपूर :- रविवार 15 जानेवारीची सकाळ ज्येष्ठ नागरिकांच्या उत्साही सहभागाने अधिक प्रसन्न ठरली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून आयोजित खासदार क्रीडा महोत्सवात ज्येष्ठ नागरिकांचा उत्साही सहभाग तरुणाईला लाजवेल असा होता. व्हीएनआयटी येथे 75 वर्षावरील ज्येष्ठांसाठी घेण्यात आलेल्या वॉकथान मध्ये सुरेश उमाठे आणि रेवती लोखंडे यांनी पुरुष आणि महिला गटात सर्वात कमी वेळेत 1.2 किमी अंतर पार केले. वेगवेगळ्या वयोगटात ज्येष्ठांनी विजय मिळविला. खासदार क्रीडा महोत्सवाचे प्रणेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विजेत्यांना बक्षीस प्रदान केले. यावेळी व्हीएनआयटी चे संचालक डॉ. प्रमोद पडोळे, प्रसिद्ध वऱ्हाडी कवी डॉ. मिर्झा रफी अहमद बेग, महोत्सवाचे संयोजक माजी महापौर संदीप जोशी, सुधीर दिवे, रमेश भंडारी, राम कोरके, मनोज चिंचखेडे, निंबाळकर, सचिन कराळकर, अनिल मानापुरे, गौरव टांकसाळे आदी उपस्थित होते. स्पर्धेदरम्यान ज्येष्ठांसाठी आरोग्य तपासणी शिबीर सुद्धा घेण्यात आले होते.
निकाल (प्रथम, द्वितीय व तृतीय)
वॉकथान – १.२ किमी
पुरुष – ७५ वर्षावरील
१. सुरेश उमाठे (१४.०३.८८)
२. डॉ. दिवाकर भोयर (१४.५५.३०)
३. श्रीपाद बुरडे (१४.५५.५८)
महिला – ७५ वर्षावरील
१. रेवती लोखंडे (१४.०८)
२. प्रेमा धवल (१४.११)
३. विद्या कालिकर (१४.११)
पुरुष – ७० ते ७५ वर्ष
१. डोमा श्रावण चाफले (१६.१०)
२. शांताराम बारापत्रे (१६.५२)
३. वासुदेव चवडे (१६.५७)
महिला – ७० ते ७५ वर्ष
१. कुसूम देशमुख (१६.५७)
२. माधुरी पाटील (१८.१५)
३. सुनिता कोपुलवार (१९.५०)
पुरुष – ६६ ते ७० वर्ष
१. सुधाकर ठाकरे
२. उल्हास शिंदे
३. जे.एम. आखरे
महिला – ६६ ते ७० वर्ष
१. वर्षा डांगे
२. नंदा लायसे
३. चंद्रकांता हरिनखेडे
वॉकथान – १.८ किमी
पुरुष – ६१ ते ६५ वर्ष
१. नागोराव भोयर
२. दामोधर वानखेडे
३. वसंत ठाकरे
महिला – ६१ ते ६५ वर्ष
१. सुनीता सुर्यवंशी
२. इंदिरा भोयर
३. स्नेहल गंधेवार