संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- नागपूर जिल्हातील ग्रामीण भागातील वकीलांची सर्वात मोठी संघटना असलेल्या कामठी वकील संघाची सार्वत्रिक निवडणूक रविवार (दि.१८) ऑगस्ट २०२४ रोजी घेण्यात येणार आहे.
अध्यक्ष व सहसचिव चे प्रत्येकी एक आणि पाच कार्यकारीणी सदस्यांच्या पदाकरीता एकूण अकरा उमेदवार रिंगणात आहेत. तर उपाध्यक्ष पदी अँड. प्रिया मेश्राम आणि सचिव पदी अँड प्रविण गजवे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
अध्यक्ष पदाच्या एका जागे करीता अँड महेश फालेकर आणि विद्यमान उपाध्यक्ष अँड अविनाश भिमटे यांच्यामध्ये थेट लढत आहे. तसेच सहसचिव पदाच्या एक जानेकरीता अँड बासित नियाज हैदरी आणि अँड पंकज यादव यांच्यामध्ये थेट लढत असून कार्यकारीणी सदस्यांच्या पाच जागे करीता अँड परिक्षित यादव, अँड रिना गणवीर, अँड मनोज शर्मा, अँड रजनी गणवीर, अँड मृणाल भेलावे, अँड शंकर कोहपरे आणि अँड भिमा गेडाम रिंगणात आहे.
या निवडणूकीमध्ये एकूण 216 मतदार असून रविवार (दि.१८) ऑगस्ट २०२४ सकाळी १० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान होवून सायंकाळी ६ वाजता मतमोजणी करण्यात येईल. अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी अँड अरुण रामटेके, सहाय्यक निवडणूक अधिकारी अँड माधुरी बेलेकर (दहाट) आणि अँड राजन सोनेकर यांनी दिली. अँड अरुण रामटेके हे तिस-यांदा मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून काम करीत आहे, हे विशेष