नागपूर ग्रामीणच्या अमित रमेश मसरकेने राज्य स्तरावरील ३४ वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा २०२४ स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले

नागपूर :- ग्रामीण पोलीस दलातील लांबउडी स्पर्धेत पोलीस अंमलदार अमित रमेश मसरके याने राज्य स्तरावरील ३४ वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा २०२४ या स्पर्धेमध्ये नागपूर ग्रामीणचे प्रतिनीधीत्व करून दिनांक ०४/०२/२०२४ ते दिनांक ०६/०२/२०२४ पर्यंत महाराष्ट्र पोलीस अॅकेडमी नाशिक येथे आयोजित झालेल्या ३४ यी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या लांब उडी स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावुन नागपूर ग्रामीणला गौरवांन्वीत केले. अमित याने ६.६३ मीटर लांबउडी मारून प्रथम क्रमांक प्राप्त केला. सुवर्णपदक पटकाविल्या बद्दल नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष ए. पोद्दार (भा.पो.से) तसेच अपर पोलीस अधिक्षक रमेश धुमाळ यांनी अभिनंदन केले. तसेच अमित मसरके याला १० हजार रू. बक्षीस जाहीर केले आहे.

अमित हा नागपूर ग्रामीण पोलीस दलात कार्यरत आहे. त्याने नेहमीच पोलीस दलातील अतिशय व्यस्त व धावपळीचे आपले दैनदिन कर्तव्य सांभाळून आपला खेळण्याचा छंद कायम जोपासला आहे. खेळाप्रती त्याची मेहनत व जिद्द पाहुन नागपूर ग्रामीण पोलीस दलातील सर्वांना त्याचा सार्थ अभिमान वाटत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अवैध्यरीत्या रेतीची चोरटी वाहतुक करणान्या दोन टीप्परवर उमरेड पोलीसांची कार्यवाही

Wed Feb 7 , 2024
उमरेड :- उमरेड पोलीसांचे पथक पोस्टे हद्दीत पेट्रोलीग करीत असताना माहीती मिळाली की, काही टीप्पर रेती भरुन उमरेडकडे येत आहेत. अश्या विश्वसनीय माहीती वरून पोलीसांनी सापळा रचुन मांगरुळ फाटा येथे पीवळ्या रंगाचा टीप्पर क्र. एम. एच. ४०/ बी.जी. ९२१६ मध्ये ०५ ब्रास रेतीची अवैध्यरीत्या वाहतुक करताना मिळुन आल्याने एकुण १२,२५,०००/- रू.या मुद्देमाल जप्त केला असुन सदर टीप्परचा चालक सुनील दयाराम […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights