अवैध रेतीची चोरटी वाहतुक करणाऱ्या आरोपीताविरूद्ध गुन्हा नोंद, वाहनासह एकूण ३८,८४,०००/- रूपयाचा मुद्देमाल जप्त

– नागपूर ग्रामीण विशेष पथकाची कारवाई

नागपूर :-दिनांक ०४/०४/२०२४ रोजी पोलीस अधिक्षक यांचे विशेष पथकातील स्टाफ पोस्टे कन्हान हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय सूत्रधाराकडून माहीती मिळाली की, १६ चक्का एल पी गाडी आमडी फाट्याकडून कन्हान मार्ग नागपूर कडे अवैधरीत्या विनापरवाना रेती वाहतूक करीत आहे. अशा खात्रीशीर बातमीवरून जबलपूर ते नागपूर मेन हायवेरोडवर टेकाडी शिवारात (साटक) जिवो पेट्रोलपंप जवळ नाकाबंदी केली असता १६ चक्का टाटा कंपनीची एलपी गाडी क्र. एम.एच-३२/ए.के-१७८६ चा चालक आरोपी नामे- १) गणेश जनार्धन नेहारे वय ४० वर्ष रा. वार्ड क्र. १ केळझर ता. सेलु जिल्हा वर्षा २) राजेंद्र बबनराव वांदिले, वय ४२ वर्ष रा. सेलु जिल्हा वर्षा ३) नागो मारोतराव सावरकर वय ३५ वर्ष रा. वार्ड क्र. ११ सेलु वर्धा यांना स्टाफने थांबवून पाहणी केली असता वाहनामध्ये अंदाजे १४ ब्रास रेती मिळून आल्याने सदर वाहन चालकास ट्रक मधील रेतीचे रॉयल्टी बाबत विचारले असता रॉयल्टी नसल्याचे सांगितल्याने व सदरची रेती ही चोरीची असल्याची खात्री झाल्याने आरोपींच्या ताब्यातून १६ चक्का टाटा कंपनीची एलपी गाडी क्र. एम.एच-३२/ए.के-१७८६ किंमती ३८,००,०००/- रू. मध्ये अंदाजे १४ ब्रास रेती किंमती प्रत्येकी ब्रास ५०००/-रू. प्रमाणे ७०,०००/-रू. वगेवगळया कंपनीचे मोबाईल किंमती १४,०००/-रू. असा एकुण ३८,८४,०००/- रूपयाचा मुद्देमाल जप्त करून आरोपी नामे १) गणेश जनार्धन नेहारे वय ४० वर्ष रा. वार्ड क्र. १ केळझर ता. सेलु जिल्हा वर्षा २) राजेंद्र बबनराव वादिले, वय ४२ वर्ष रा. सेलु जिल्हा वर्षा ३) नागो मारोतराव सावरकर वय ३५ वर्ष रा. वार्ड क्र. ११ सेलु वर्षा ४) पाहीजे आरोपी इरशाद सिंकदराखॉ पठान, वय ३७ वर्ष रा. सेलु वर्षा असे एकुण ०४ आरोपी यांचेविरुद्ध पोस्टे कन्हान येथे अप क्र. २५९/२०२४ कलम ३७९, १०९, ३४ भा. द.वी. सहकलम ४८ (७), ४८(८) महाराष्ट्र जमिन महसूल संहिता, सहकलम २१, ०४ खाणी आणि खनिजे अधिनियम १९५७ सहकलम ३ सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक अधि. १९८४ अन्वये पो. स्टे. भिवापूर येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोद्दार (भापोसे), अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक सा. यांचे विशेष पोलीस पथकातील सहायक पोलीस निरीक्षक किशोर शेरकी, पोलीस हवालदार ललीत उईके, पोलीस नायक प्रणय बनाफर, पोलीस अंमलदार कार्तिक पुरी, बालाजी बारगुले विशेष पथक नागपूर ग्रामीण यांनी केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कामठी-मौदा तालुक्यातील प्रत्येक बूथ,करूया महायुतीसाठी मजबूत! - अनिल निधान

Sat Apr 6 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- 6 एप्रिल भारतीय जनता पार्टी चा स्थापना दिवस माजी जी प सदस्य अनिल निधान यांच्या मुख्य उपस्थितीत कामठी तालुक्यातील कढोली गावातील बूथ क्र 266 येथे साजरा करण्यात आला. याप्रसंगी माजी जी प सदस्य अनिल निधान यांनी सांगितले की लोकसभा निवडणूक ही भाजपा पक्ष संघटनेला आपली ताकद दाखवण्याची सुवर्णसंधी आहे. आत्तापर्यंत विविध अभियान व उपक्रमांद्वारे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com