गावागावात चालली बावनपत्ती जोमात,अन पोलिस प्रशासन कोमात..

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी ता प्र 27 – तान्हा पोळा हा पोळ्याचा पाळवा असे म्हटले जाते या पाळव्याच्या दिवशी बहुतांश घरी मटण पार्टी केली जाते, यानुसार घरोघरी पुरणाची पोळी,मटण, व चविदार जेवनाची सोय करण्यात आली होती तर शहरी व ग्रामीण भागात मात्र जुगाऱ्याचा पोळा भरला असून विविध ठिकाणी सुरू असलेल्या जुगार अड्यावर मोठी उलाढाल करण्यात आली.परिणामी यावेळी पोळ्याच्या पाळव्याला गावागावात बावनपत्ति जोमात दिसून आले.मात्र पोलीस प्रशासन कोमात दिसून आले

पोळा हा बळीराजाचा सर्वात मोठा सण असला तरी त्या पाश्वरभूमीवर जुगाराला अक्षरशः उधाण येत असल्याने गावागावात जुगार खेळताना दिसून आले गावातील पॉश फॉर्महाऊस वर सुद्धा लाखो रुपयांचा जुगार खेळ झाला .पोलिसांचा ससेमिरा चकविण्यासाठी जीर्ण घर सामसूम ठिकाणी जुगाऱ्याचा वावर वाढताना दिसून आला .तीन पत्ती, चौरेल, व कट पत्ति या खेळातुन लाखो रुपयांचा जुगार झाला . .या पोळा सणाच्या निमित्ताने शहरी व ग्रामिण भागात लाखो रुपयांची उलाढाल झाली असून काही मालामाल तर काहींचे खिसे खाली होत असल्याचे चित्र दिसून आले.तसेच गल्लीबोळात खेळणारे जुगारी पाळव्याला कित्येक ठिकाणी गुप्तचर पद्धतीने बसून मोठ्या प्रमाणात कटपत्तीचा जुगार खेळला गेला .

पोळ्याचा पाळवा सोडला तरी कामठी तालुक्यातील शहरी तसेच ग्रामीण भागात गुप्तचर पद्ध्तीने अजूनही जुगार अड्डे सुरू आहेत हे जुगार खेळण्यासाठी जुगारी व्याजाने पैसे आणून जुगाऱ्याचा खेळ सुरू आहे जुगारात खेळलेली रक्कम परत काढण्यासाठी ती रक्कम परत काढण्यासाठी खटाटेप सुरू आहे तर कित्येकावर जुगारामुळे कर्जाचे डोंगर झाले आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com