संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- पोलिस विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या कोंबिंग ऑपरेशन दरम्यान स्थानिक नविन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या नीलम लॉन मध्ये अवैधरीत्या सुरू असलेल्या जुगार अड्यावर धाड घालण्यात पोलिसांना गतरात्री 9 दरम्यान यशप्राप्त झाले असून या धाडीतून पाच जुगाऱ्याना ताब्यात घेत त्यांच्याकडून 52 तास पत्ते व नगदी 2030 रुपये असा एकूण 2080 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.तसेच कुंभारे कॉलोनी व रमानगर च्या अवैध दारू अड्यावर सुद्धा धाड घालून एक महिला व पुरुष आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.
जुगार अडयावरील धाड प्रकरणातील पाच आरोपी मध्ये सलमान हुसेन नासिर हुसेन वय 21 वर्षे,विशाल मसराम वय 19 वर्षे,शिवम उईके वय 23 वर्षे,सफिक शेख सलमान वय 22 वर्षे,शंकर मेश्राम वय 33 वर्षे सर्व राहणार बाबा अब्दुल्लाहशाह दरगाह कामठी असे आहे.
ही यशस्वी कारवाही वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक जिवन भातकुले, संजय पिल्ले आदींनी केली.