नागपुर :- नागपुरला गड्ड्याचे शहर अशी ओळख मिळत आहे. पांचपावली पुलावर याचा प्रत्येय आपल्याला येतो. यावरून जाणारे प्रत्येक वाहन चालक घोड्यावर बसून जात असल्याचा अनुभव इथे करतात. या पुलावरील गड्डे काही प्रमाणात भरतात पण ते काही दिवसातच परत गड्ड्याच्या स्वरूपात आपल्याला बघायला मिळतं. असंच हा बोलके चित्र.
यावरील वाहनचालकाशी बोललो असता त्यांनाही या पुलावरून मोदीच्या येण्याची वाट आहे. जेणेकरून या पुलाचेही भविष्य पालटेल व पूर्ण पुलाला डांबरीकरण करून गड्डे मुक्त करता येईल. यावरील जाणारे प्रवासी एक दुसऱ्याला विचारतात “इस पर मोदी कब आयेंगे”. कारण मोदीच्या येण्याने रेल्वे स्टेशन समोरील पूल पूर्णपणे बरा होऊन गड्डे मुक्त झालेला आहे. असाच गड्डे मुक्त होण्याची वाट सगळे बघतात आहे.