नागपूर :- दिनांक 30/11/2022 ला मध्य नागपुर विधानसभा युवक काँग्रेस तर्फे कोतवाली पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक यांना चोरी गेलेले गडर शोधून देण्याबाबत निवेदन देण्यात आले. कारण दसरा रोड रेणुका माता मंदीर महाल जवळील गडर मागील काही वर्षंपासन गहाळ झाला आहे. डामबरी रोडचे सिमेंटी करण करतेवेळी नागपुर महानगर पालिका गांधीबाग झोन येथील वरीष्ठ अधिकारी यांच्या हलगर्जीपणामुळे गदरचा चेंबर गहाळ झाला. त्यामुळे परिसरातील नागरिकांना गडारची दुर्गंधी येने, विहरित गडरचे पाणी सुटणे अश्या विविध समस्यांना बऱ्याच दिवसापासून त्रास सहन करावा लागत आहे. वारंवार तक्रार करून सुद्धा नागपुर महानगर पालिका गांधीबाग झोन मधील कर्मचारी व वरिष्ठ अधिकारी हा गडर शोधण्यास असमर्थ आहे. आणि दिवसेंदिवस हा त्रास वाढतच आहे.
तरी शेवटचा पर्याय म्हणून पोलिस मोठमोठ्या चोरींचा उलगडा करतात त्यामुळे तेच याचा शोध घेऊ शकतात ..म्हणून कोतवाली पोलिस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देताना प्रदेश महासचिव आकाश गुजर,मध्य नागपुर अध्यक्ष नयन तरवटकर,सागर चव्हाण, राहुल खैरकर, अनुराग पाटणे, आदित्य वैद्य, पराग तरार, शुभम जगताप, मयुर फाळके, इंद्रजीत माने,निखिल वांगेकर, अमन लुटे, उपस्थीत होते.