-दिनेश दमाहे
नागपुर – दि. 25.08.2014 चे 21.00 वा चे सुमारास फिर्यादी शहनाज अजिज खान वय 37 वर्ष रारमाई नगर, धरम पाटील यांचे घराजवळ, पो.स्टे. पाचपावली, नागपूर या घरी हजर असतांना आरोपीतांनी संगनमत करून जुन्या भांडण्याचे कारणावरून फिर्यांदीचे घरावर दगडफेक करून जबरदस्तीने घरात प्रवेश करून फिर्यादी व तिच्या लहान मुलीला शिवीगाळ करून हातबुक्कीने मारपीट केली अशा फिर्यादीच्या रिपार्टे वरून आरोपी विरूद्ध गुन्हा कलम 452,336,504,34 भा.द.वि अन्वये दाखल करण्यात आला. सदर गुन्हयाच्या तपासा दरम्यान आरोपी क्र.01) मकसुद अहमद अमिनुद्दीन मलीक वय 24 वर्ष व 02) कयुम अहमद अमिनुद्दीन मलीक वय 30 वर्ष दोन्ही रा. रमाई नगर,
ताजनगर, पो.स्टे. पाचपावली, नागपूर यांचा शोध घेवुन मिळुन आल्याने त्यास अटक करण्यात आली होती तसेच यातील आरोपी क्र. 03) मो. फैज मलिक वल्द मो. शफिक मलिक वय 34 वर्ष रा. ताज नगर, टका पंचिशिल नगर, नागपूर याचा दिलेल्या पत्त्यावर तपासपथकाच्या मदतीने वारंवार शोध घतेला असता मिळुन येत नव्हता सदर गुन्हयाच्या तपासात पेट्रोलींग दरम्यान गुप्त बातमीदार मार्फत मिळालेल्या माहीतवरून मागील सात वर्षापासुन नमुद गुन्हयातील फरार असलेला आरोपी नामे मोहम्मद फैज मलिक वल्द मोहम्मद शफिक मलिक, वय 34 वर्ष रा. ताज नगर टेका पंचशिल रोड सागर ज्वेलर्स च्या मागे पो.स्टे. पाचपावली नागपुर हा पो.स्टे. हद्दीत फिरत असल्याचे माहीती वरून स्टॉफसह शोध घेतला असता मिळालेल्या वर्णनानुसार आरोपी दिसुन आल्याने त्यास मोठया शिताफितीने ताब्यात घेवुन त्यास पो.स्टे. ला आणुन सदर गुन्हयाबाबत विश्वासात घेवुन बारकाईने विचारपुस केली असता त्याने सदरचा गुन्हा यातील आरोपी क्र 01 व 02 यांचे साबेत केला असल्याचे कबुल केल्याने त्यास नमुद गुन्हयात अटक करण्यात आली
सदरची कामगिरी परि.क्र.3 नागपूर शहराचे पोलीस उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने, सहा. पोलीस आयुक्त(लकडगंज विभाग) संतोष खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.स्टे. पाचपावलीचे व.पो.नि संजय मेंढे, पोनि(गुन्हे) रवि नागोसे, पाउे पनि अविनाश जायभाये, सपोउपनि रहेमत शेख, नापोअं. पवन भटकर, रोमेश मेनेवार, पो अं. रूपेश सहारे, राकेश सिंग, राजु श्रीवास यांनी केली आहे.