विभागीय आयुक्त कार्यालयात ‘ओवरियन कॅन्सर’ जनजागृती उपक्रम

नागपूर :- ‘ओवरियन कॅन्सर जनजागृती महिन्या’च्या औचित्याने विभागीय आयुक्त कार्यालयात सोमवार, ३० सप्टेंबर रोजी महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांकरिता ‘ओवरियन कॅन्सर- लक्षणे, निदान आणि उपचारपद्धती’ विषयावर तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले.

महसूल व वन विभागाच्या अपर आयुक्त डॉ. माधवी खोडे-चवरे यांच्या संकल्पनेतून आयोजित या कार्यक्रमामध्ये कॅन्सरशी यशस्वी लढा देणाऱ्या शासकीय रुग्णालय व महाविद्यालय नागपूरच्या मायक्रोबायोलॉजी विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. संगिता खेडीकर यांनी प्रमुख वक्ता म्हणून मार्गदर्शन व स्वानुभव कथन केले. या कार्यक्रमातील प्रमुख मार्गदर्शक प्रसूती आणि स्त्री रोगतज्ञ डॉ. स्नेहल समर्थ यांनी उपस्थितांना या आजाराशी निगडीत सादरीकरणाच्या माध्यमातून दैनंदिन जीवनात अवलंबायच्या जीवनशैली विषयी मार्गदर्शन केले.

चाळीशीनंतर महिलांना ओवरी, ब्रेस्ट, सर्वायकल या बद्दल विशेषत्वाने काळजी घेण्याबद्दल मार्गदर्शन यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. वार्षिक‍ स्क्रिनिंग करून घेण्यासह प्राधान्याने आरोग्याकडे लक्ष देणे, बारिक-सारिक लक्षणांकडे दुर्लक्ष नकरणे, कॅन्सरचे निदान झाल्यास वेळीच योग्य उपचार घेवून त्यास खंबीरपणे पुढे जावे, असा मोलाचा संदेश ही यावेळी देण्यात आला.

निरोगी राहणे महत्वाचे असून याचे सतत स्मरण ठेवावे. महिलांच्या कँसरबाबत पुरुषांनाही योग्य माहिती असावी, अशी अपेक्षा डॉ. माधवी खोडे-चवरे यांनी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केली. प्रादेशिक विभागीय चौकशी अधिकारी दीपाली मोतियेळे यांनी प्रास्ताविक केले. भुसुधार विभागाच्या सहायक आयुक्त शिल्पा सोनोले यांनी सूत्रसंचालन केले तर कस्तूरी वैद्य यांनी आभार मानले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत मुंबई विभागातील 800 ज्येष्ठ नागरिक अयोध्येला जाणार

Wed Oct 2 , 2024
नवीमुंबई :- सामाजिक न्याय विभागाच्या मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजने अंतर्गत मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे या जिल्हयातील 800 ज्येष्ठ नागरिक 04 ऑक्टोबर 2024 रोजी अयोध्येसाठी विशेष ट्रेन ने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) सीएसटी येथून रवाना होणार आहेत.https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/11/WhatsApp-Video-2024-11-13-at-13.36.19_a6cf01ac.mp4 राज्यातील सर्व धर्मीयांमधील ज्येष्ठ नागरीक जे 60 वर्ष किवा त्याहून अधिक वयाचे आहेत त्यांना तिर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पुर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री तिर्थदर्शन योजना […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com