– संदीप कांबळे, कामठी
कामठी ता प्र 11:-स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या हमालपुरा येथील प्राचीन श्री शनी मंदिरातून एका अज्ञात चोरट्याने मंदिरात अवैधरित्या प्रवेश करून मंदिराच्या दानपेटीतील दानरक्कम चोरून नेल्याची घटना गतरात्री दीड वाजे दरम्यान घडली असून यासंदर्भात फिर्यादी कपिल गायधने यांनी पोलीस स्टेशन ला दिलेल्या माहिती वरून तपासाला गती दिली असून पुढील तपास सुरू आहे.