२२ जानेवारी पासुन होणार मोफत आरोग्य तपासणी व योग शिबिरे, चंद्रपूर मनपाचा पुढाकार

सर्व योग समितींचा राहणार सहभाग

महानगरपालिकास्तरीय योग समिती होणार स्थापन

चंद्रपूर  :- येत्या २२ जानेवारी पासुन महानगरपालिकास्तरीय योग समितीद्वारे चंद्रपूर शहरात विविध ठिकाणी योग शिबिरे घेतली जाणार असुन ही केवळ शिबिरे काही दिवसांपुरती मर्यादीत न राहता योग वर्गात परिवर्तित होऊन कायम सुरु राहावी या दृष्टीने प्रयत्न केले जाणार असल्याचे आयुक्त विपीन पालीवाल यांनी सांगितले.

आज योगाला मानवी आरोग्याचा रक्षक म्हणुन जागतिक मान्यता मिळालेली आहे. नागरीकांचे आरोग्य निरोगी राहावे या दृष्टीने योगाचा प्रचार प्रसार करण्यास मोठ्या प्रमाणात योग शिबिरे घेण्याचे शासनाचे निर्देश आहेत. त्यानुसार चंद्रपूर महानगरपालिकेद्वारे १३ जानेवारी रोजी पतंजली योग समिती व योगनृत्य परीवार यांची आढावा बैठक मनपा स्थायी समिती सभागृहात आयुक्त विपीन पालीवाल यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यानंतरही शहरातील सर्व योग समिती यांची बैठक घेण्यात येऊन शिबिरांचे नियोजन केले जाणार आहे.

येत्या २२ जानेवारी पासुन शहरात मनपा व पतंजली समिती द्वारे रामकृष्ण मंदिर कृष्ण नगर,श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान स्नेहनगर, नुतन व्यायामशाळा घुटकाला वॉर्ड, पाचदेऊळ मंदिर गंज वॉर्ड, मनपा शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र क्र.५ बाबुपेठ, काळाराम मंदिर समाधी वार्ड, हनुमान मंदिर वैद्य नगर तुकूम येथे तर योगनृत्य परीवारातर्फे दीनदयाळ उपाध्याय गार्डन दुर्गा माता मंदिर जवळ सरकार नगर, पंचतेली हनुमान मंदिर जटपूरा गेट,नेहरू विद्यालय घुटकाळा वार्ड,महाकाली कॉलरी कँटीन चौक,हिंगलाज भवानी शाळा बाबुपेठ,कोहिनुर स्टेडीयम, पं. दीनदयाळ उपाध्याय शाळा तुकूम अश्या एकुण १४ ठिकाणी सकाळी ६ ते ८ या वेळेत योग शिबिरे घेतली जाणार आहेत तसेच येणाऱ्या नागरीकांची आरोग्य तपासणीही मनपा आरोग्य विभागातर्फे केली जाणार आहे. सध्या पतंजली योग समितीद्वारे ८५ तर योगनृत्य परीवाराद्वारे ५७ केंद्रांवर योगवर्ग शहरात घेतले जातात. मात्र जे नागरीक योग वर्ग व त्याद्वारे होणाऱ्या लाभापासुन वंचित आहे त्या सर्वांसाठी मनपाद्वारे योग शिबिरे घेतली जाणार आहेत. लवकरच योग समिती व मनपा यांची संयुक्त योग समिती तयार केली जाणार असुन त्याद्वारे योगचा प्रचार प्रसार होण्यास मदत मिळणार आहे. या योग शिबिरांचा अधिकाधिक नागरीकांनी लाभ घेण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

याप्रसंगी सहायक आयुक्त विद्या पाटील, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ, वनिता गर्गेलवार,गोपाल मुंधडा, डॉ. सपनकुमार दास, पतंजली योग समितीचे अंजली साटोणे, स्मिता रेभनकर, नसरीन शेख, अपर्णा चिडे, ज्योती मसराम, विजय चंदावार, कविता मंघानी ,रमेश ददभाल,सपना नामपल्लीवार,नीलिमा शिंदे,ज्योती राऊत, कल्याणी येडे तर योगनृत्य परिवाराचे विशाल गुप्ता, सुरेश घोडके आकाश घोडमारे, मुग्धा खांडे पूनम पिसे,मीना निखारे व मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

खासदार क्रीडा महोत्सव, कबड्डी स्पर्धेत एकलव्य, मराठा लॉन्सर्सला विजेतेपद

Wed Jan 18 , 2023
कबड्डी (विदर्भस्तरीय) विभागीय क्रीडा संकुल, मानकापूर नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून शहरात सुरू असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील कबड्डी स्पर्धेच्या अंतिम लढतीत सीनिअर पुरूष गटात एकलव्य क्रीडा मंडळ नागपूर संघाने ओम अमर क्रीडा मंडळ नागपूर संघाचा ९ गुणांनी तर सीनिअर महिला गटात चुरशीची लढत देत मराठा लान्सर्स महाल, नागपूर संघाने रवींद्र क्रीडा मंडळ, उमरेड संघाचा अवघ्या एका गुणाने […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!