“थँक्स गिव्हिंग डे” निमित्त पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल व शालेय विद्यार्थी यांनी साधला एकमेकांशी संवाद

नागपूर :- नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांच्या नेतृत्वाखाली “थँक्स गिव्हिंग डे” निमित्ताने आयोजित एका आगळ्या कार्यक्रमात पोलीस आणि शालेय विद्यार्थ्यांनी एकमेकांशी संवाद साधला. “सिंगल पॅटर्न” साठी प्रसिद्ध असलेल्या पोलीस आयुक्त यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना एकमेकांबद्दल “कृतज्ञ” कसे राहावे व जीवनात सकारात्मक दृष्टिकोन कसा ठेवावा ? हे पटवून दिले.

पोलीस आयुक्तांनी “थँक्स गिव्हिंग डे” च्या निमित्ताने विद्यार्थ्यांना आभार व्यक्त करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, आभार व्यक्त केल्याने नातेसंबंध घट्ट होतात, मानसिक व शारीरिक आरोग्य सुधारते आणि तणाव कमी होतो. साधा “धन्यवाद” या शब्दांने किंवा कृतीतून कृतज्ञता व्यक्त केली जाऊ शकते, ज्यामुळे व्यक्ती आणि समाज अधिक सकारात्मक बनतो.

या कार्यक्रमात ” सेंट्रल इंडिया पब्लिक स्कूल, लकडगंज येथील ३० मुले व मुली असे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला . सर्व विद्यार्थी हे सहावी ते आठव्या वर्गातील होते. विद्यार्थ्यांनी त्यांच्या निरागस मनात असलेले अनेक प्रश्न विचारले. जसे की, पोलीस तपास कसा करतात ? पोलीस घटनास्थळी पुरावे कसे गोळा केले जातात? डिजिटल पुरावे आणि त्यांचा उपयोग काय?सुरक्षेबाबत टिप्स कोणत्या? आपण आयपीएस कसे बनले?सोशल मीडियाचा गैरवापर झाल्यास काय करावे?लहान मुले किडनॅप झाली आणि मोबाईल नसेल तर काय करावे? असे नानाविध प्रश्न मुलांच्या मनात होते. या सर्व प्रश्नांची पोलीस आयुक्तांनी अतिशय सविस्तर व समर्पक उत्तरे दिली.पोलीस आयुक्तांनी विद्यार्थ्यांशी सर्व प्रथम चर्चा करताना हे नमूद केले की, पोलिसांबद्दल असलेली तुमची भीती दूर करा आणि पोलिसांना समाजाचे रक्षक माना. “छोटा पोलीस” बनून पोलिसांना मदत करा. वाहतुकीचे नियम पाळा.

पोलिसांच्या कामाचे स्वरूप, जबाबदाऱ्या, आणि आव्हाने , समाजात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस कसे काम करतात ? यावर चर्चा झाली.कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी फीडबॅक देखील दिले. विद्यार्थ्यांनी पोलीस आयुक्तांना “हेल्मेट आणि सीट बेल्टचा वापर न करणाऱ्या पालकांना देखील नियमांचे पालन करण्यासाठी दंड करण्याचे” अनोखे उपाय सुचवले. पोलीस आयुक्तांनी या लहान बालका सोबत अल्पोहार करून त्यांच्याशी हितगुज साधुन हास्य विनोद करून हलके वातावरण निर्माण केले तसेच चांगला विद्यार्थी घडून समाज कसा निर्माण होतो याबाबत गंभीर चर्चा, विविध उदाहरण, प्रसंग ,घटना किस्से सांगून केली.

हा कार्यक्रम पोलीस भवनमधील कॉन्फरन्स हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता. आरजे निशा आणि त्यांच्या टीमच्या मेहनतीमुळे कार्यक्रम अधिक यशस्वी झाला. हा संवाद सत्र दुपारी १२ ते १.३० पर्यंत रंगला.”थँक्स गिव्हिंग डे”च्या निमित्ताने झालेल्या या कार्यक्रमाने विद्यार्थी आणि पोलिसांमधील दुरावा कमी होऊन विश्वास नाते निर्माण झाले आणि संवाद याद्वारे मन मोकळे होऊन भीती दूर झाली. पोलिसांच्या कार्यपद्धतीबद्दल विद्यार्थी अधिक जागरूक झाले . कार्यक्रमाच्या शेवटी पोलीस आयुक्त यांनी सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वतःच्या केबिनमध्ये नेले व त्यांची कामकाज कार्यप्रणाली कशी चालते ? याबाबत माहिती देखील दिली. “थँक्स गिविंग डे” च्या निमित्त हा पोलीस आयुक्तांनी राबववलेला उपक्रम कृतज्ञतेची भावना जोपासणारा तर आहेच शिवाय तो युवा वर्गांसाठी प्रेरणादायी देखील ठरला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

 '६३ व्या महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धे'च्या नागपूर केंद्रात प्राथमिक फेरीत ' द ब्लॅकड इक्वेशन ' नाट्य प्रयोग

Sat Nov 30 , 2024
– महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय तर्फे आयोजित नागपुर :- महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय तर्फे आयोजित ‘६३ व्या महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धे’च्या नागपूर केंद्रात प्राथमिक फेरीत रखुमाई सेवा मंडळ संस्थेतर्फे ‘ द ब्लॅकड इक्वेशन ‘ हे नाटक सादर करण्यात आले. सध्या काहीतरी कारणांमुळे राष्ट्र राष्ट्रांमधला संघर्ष वाढत जात आहे या संघर्षाची परिणीती एके दिवशी आण्विक शस्त्राचा उपयोग होण्यापर्यंत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com