संदीप कांबळे, कामठी
कामठी फार्मसी महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन
कामठी ता प्र 8:-श्री सदाशिवराव पाटील शिक्षण संस्था कामठी द्वारा संचालित श्रीमती किशोरीताई भोयर काॅलेज आॅफ फार्मसी कामठी तसेच श्रीमती शांताबाई पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कामठी या महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन ‘क्षितीज’ चे उद्घाटन सोहळा स्व वसंतराव देशपांडे सभागृह सिव्हिल लाइन्स नागपुर येथे दिनांक ९ मे २०२२ ला सकाळी ९.०० वाजता थाटात पार पडला.
कार्यक्रमाला संस्थेच्या अध्यक्षा किशोरीताई भोयर, अरविंद कुमार, सेंटर हेड टीसीएस नागपूर, विजयानंद चक्रपाणी, साईट क्वालिटी हेड ल्युपीन लिमी नागपूर, टी विजय कुमार, हेड एच.आर. ल्युपीन लिमी नागपूर, कुलदिप राना, डिलेवरी सेंटर प्रोग्राम मॅनेजर टीसीएस नागपूर यांच्या शुभहस्ते तसेच संस्थेचे सचिव सुरेश भोयर, संस्थेच्या उपाध्यक्षा अनुराधा भोयर, संचालक अनुराग भोयर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मिलिंद उमेकर, डॉ अतुल हेमके, विद्यार्थी परिषदेचे प्रमुख प्राध्यापक राधेश्याम लोहिया प्रामुख्याने उपस्थितीत होते. यावेळी फार्मसी विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष प्रथमेश मत्ते, आर्या लांजेवार, ईश्वर बडवाईक, साक्षी काटरपवार उपस्थित होते.
याप्रसंगी ल्युपीन लिमी नागपूर यांच्यातर्फे बी.फार्म अंतिम वर्षातील गुणवत्ता प्राप्त विद्यार्थिनी कु. कल्याणी ठोंबरे तसेच एम.फार्म अंतिम वर्षातील कु. निकीता नायडू यांना कंपनीच्या उपस्थित अधिकारी मान्यवरांच्या हस्ते ल्युपीन स्काॅलर अवार्ड प्रदान करण्यात आला.
यावर्षी पासून प्रथमच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व यादवरावजी भोयर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बी.फार्म प्रथम वर्षात प्रवेशित गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी आर्या लांजेवार तसेच तन्मय चिमुरकर यांना महाविद्यालयातर्फे संस्थेच्या अध्यक्षा किशोरीताई भोयर यांच्या हस्ते स्व. यादवरावजी भोयर मेमोरियल शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.
यावेळी महाविद्यालयाची ई-बुलेटीन तसेच एसकेबी टाईम्स चे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मिलिंद उमेकर यांनी केले, तसेच आभार प्रदर्शन विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष प्रथमेश मत्ते यांनी केले. याव्यतिरिक्त स्नेहसंमेलन ‘क्षितीज’अंतर्गत विद्यार्थ्यांद्वारे नाटक, वादविवाद स्पर्धा, नृत्य, गायन, प्रश्नमंजुषा, फॅशन शो, व्यक्तिमत्त्व स्पर्धा, मुकनाट्य इत्यादी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचा समारोप दि. १० मे ला बक्षीस वितरणाद्वारे करण्यात येईल. या संपूर्ण कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मिलिंद उमेकर यांच्या मार्गदर्शनात फार्मसी विद्यार्थी परिषद तसेच सर्व विभागातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी अथक प्रयत्न करीत आहेत.
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा या मुख्य उद्देशाने मागील २२ वर्षांपासून अश्या प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. औषधीनिर्माणशास्त्र सारख्या व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना एक हक्काचं व्यासपीठ मिळावं हा या आयोजनामागील उद्देश असल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मिलिंद उमेकर यांनी यावेळी सांगितले.