नागपुर – स्मृतिशेष मधुकरराव तामगाडगे चॅरिटेबल ट्रस्ट तसेच संघटीत महिला बचत गटाच्या संयुक्त विद्यमाने सम्राट अशोक बुद्ध विहाराच्या सामुदायिक विकास केंद्रात निशु:ल्क आरोग्य तपासणी व औषध वितरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून स्मृतीशेष मधुकरराव तामगाडगे चॅरिटेबल ट्रस्टच्या उपाध्यक्षा लिना तामगाडगे तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेविका वंदना भगत, न्यू सीड संस्थेच्या स्वाती पडोळे रोहिणी भालेराव, संघटित महिला बचत गटाच्या वर्षा साखरे, दीपा इंगोले, मिताली तायडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. सकाळी 11 ते सायंकाळी 5 पर्यंत पार पडलेल्या या शिबीरामध्ये मधुमेह तपासणी, बिपी माॅनेटरिंग, ई.सी.जी तपासणी व निःशुल्क औषध वितरणाचा लाभ कौशल्यानगर, चंद्रमणीनगर, जयभीम नगर परिसरातील शेकडो नागरिकांनी लाभ घेतला.
याप्रसंगी मुख्य अतिथी स्मृतिशेष मधुकरराव तामगाडगे चॅरिटेबल ट्रस्टच्या उपाध्यक्षा लिना तामगाडगे मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, बदललेल्या जीवनशैलीमुळेही शरीरात विविध आजार घर करीत आहेत. आपल्या देशात सर्वाधिक पैसा हा आरोग्यावर खर्च होत असतो. सध्या पावसाळयाचे दिवस आहे. सर्वांनी आपल्यासह कुटुंबातील सर्व सदस्यांची काळजी घ्यावी. तसेच निरोगी जीवन जगायचे असेल तर प्रत्येकांनी आपल्या शरिराची काळजी घेणे अत्यावक्षक आहे. यामुळे शारीरिक, मानसिक, भावनिक विकासासोबतच प्रत्येकांचे आरोग्य सुदृढ राहणार, असेही लिना तामगाडगे यावेळी म्हणाल्या. कार्यक्रमाचे संचालन व आभार स्मृतीषेश मधुकरराव तामगाडगे चॅरिटेबल ट्रस्टचे व्यवस्थापक अमोल कांबळे यांनी मानले.
अशोक बुद्ध विहारात निशु:ल्क आरोग्य तपासणी व औषध वितरण शिबिर
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com