भंडारा गोंदिया लोकसभा निवडणूकीकरिता आमदार रोहित पवार व जिल्हाध्यक्ष किरण अतकरी यांच्या नावाचा प्रस्ताव पारित

भंडारा :- राष्ट्रवादी कॉग्रेस शरद पवार पक्षाच्या दिनांक ८ फेब्रु. २०२४ रोजी भंडारा येथील विश्रामगृह येथे जिल्हा अध्यक्ष किरण अतकरी यांच्या अध्यक्षतेखाली व नरेश ईश्वरकर जिल्हा परिषद सदस्य तथा भंडारा जिल्हा संघटणमंत्री तसेच एकनाथ फेंडर जिल्हा परिषद सदस्य तथा तुमसर-मोहाडी विधानसभा अध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीत भंडारा जिल्हा राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वतीने येणार्‍या लोकसभा निवडणुक संदर्भात पक्षाच्या वतीने लोकसभा निवडणूकीमध्ये युवा नेते तसेच पक्षाचे नेते रोहीत पवार व भंडारा जिल्हाध्यक्ष किरण अतकरी या दोन नावावर चर्चा करून उमेदवारांच्या प्रस्तावाला बैठकीत सर्वसंमंतीने प्रस्ताव पारीत करण्यात आले आहे. यासोबतच ज्योत निष्ठेची सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी प्रत्येक घरी जाऊन त्यांच्या घराचा, त्यांच्या मोबाईलने मिस कॉल करून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला समर्थन करिता कार्यक्रमाचे आयोजन, बुथ कमिटी, ओबीसी रॅली बद्दल माहिती, जिल्हा परिषद सर्कल प्रमुख याबाबत चर्चा करण्यात आली.

सदर प्रस्तावाला नरेश ईश्वरकर संघटणमंत्री यांनी लोकसभेच्या निवडूकीकरीता युवा नेते रोहित पवारांच्या नावाचे प्रस्ताव बैठकीत मांडण्यात आले. बैठकीत सर्वानुमते रोहित पवार यांच्या नावावर सर्वसंमती देण्यात आली. त्यासोबतच तुमसर मोहाडी विधानसभा अध्यक्ष तसेच जिल्हा परिषद सदस्य एकनाथ फेंडर यांच्यातर्पेâ किरण अतकरी यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवण्यात आला.

बैठकीमध्ये ठाकचंद मुंगुसमारे युवक अध्यक्ष, अनिता गजभिये महिला जिल्हा अध्यक्ष, विजय बारई पक्षाचे नेते,देवानंद चौधरी जिल्हा उपाध्यक्ष, मधुकर भोपे, निशांत सुखदेवे, सुनील शेंडे, जिल्हा सचिव, राजा खान जिल्हा सचिव, नरहरी वरकडे अनुसूचित जमाती सेल अध्यक्ष, नितेश मारवाडे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष, सुखराम अतकरी सहकार सेलचे अध्यक्ष, राजेश शिवरकर विमुक्त भटक्या मच्छीमार अध्यक्ष, दिलीप सोनुले महासचिव, अजय मेश्राम भंडारा-पवनी विधानसभा अध्यक्ष, कुनाल पवार तालुका पवनी अध्यक्ष, श्याम कांबळे मोहाडी, विलास कडुकर साकोली,ईश्वर कळंबे भंडारा ग्रामीण, मधुकर चौधरी भंडारा शहर अध्यक्ष, गौरव पडोळे पवनी शहर अध्यक्ष, शाहीना पठाण भंडारा महिला शहर अध्यक्षा, निलिमा रामटेके भंडारा शहर महिला सचिव, नितिन तलमले विधानसभा उपाध्यक्ष भंडारा-पवनी,राकेश श्यामकुवर मिडिया प्रमुख, प्रफुल्ल गायधने, घनश्याम वंजारी पवनी तालुका युवा, रजत कहालकर, अतुल कापगते, कृणाल मलेवार, सविता भुरे, ईश्वर तांडेकर, शुभम खांडेकर, गौरीशंकर पालांदुरकर, डॉ.रुपेश भाजिपाले, राकेश हटवार लाखनी, रविकिरण लंजे, यशवंत मोहरकर, जयंत मेरूगवार, उषा रामटेके, गणेश ठवकर, यशवंत भोयर, अजय सेलोकर, विजय नवखरे, भुषण लांडगे, बबन बुधे , भारत मेश्राम, जितेंद्र श्यामकुवर, आशिष पडोळे, भाऊदास धुर्वे, राजकुमार बांते चिचबोडी, नीतु मोहतुरे, निलीमा मेश्राम , मधुकर पर्वते, वसंता कडूकर, शुभम बोरकर, विलास बनकर , राजेश हजारे, कार्तिक देशमुख, रुपचंद लिंगायत, विलास झोडापे, यशवंत सलामे, ललिता मडावी, पारबता न्यायमूर्ती, संजय नवखरे व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भौतिक सोयीसुविधांसह उत्तम संस्कारही आवश्यक - केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी

Sun Feb 11 , 2024
– निरामय सेवा संस्थेचा दहावा वार्षिकोत्सव नागपूर :- सुसह्य जीवनासाठी भौतिक सोयीसुविधा आवश्यक आहेत. पण, त्यासोबतच चांगला माणूस घडविण्याच्या दृष्टीने उत्तम संस्कारही आवश्यक आहेत. निरामय सेवा संस्था हे संस्कार नवीन पिढीला देण्याचे काम करीत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी आज (शनिवार) केले. निरायम बहुउद्देशीय सेवा संस्थेचा दहावा वार्षिकोत्सव नागपूर शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com