मौल्यवान झाडे विनामूल्य वाटप 

नागपूर :- जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने भारतीय जलसंसाधन संस्था नागपूर तर्फे ५ जुन रोजी 1000 मौल्यवान झाडे विनामूल्य वाटप करण्यात आले. लक्ष्मी भुवन चौक, धरमपेठ येथे विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक इंजि. राजेश सोनटक्के, सुप्रसिद्ध आर्टिस्ट विवेक रानडे, भारतीय जलसंसाधन संस्थेचे अध्यक्ष डॉ प्रवीण महाजन, इंजि. आर. जी. पाटील, इंजि. रविंद्र वानखडे यांचे हस्ते नागरीकांना विविध प्रजातींच्या एक हजार रोपट्यांचे वाटप करण्यात आले.

अन्न वस्त्र निवारासह सर्व गरजा पूर्ण करणारी झाडे आपल्याला शुद्ध हवा देतात ऑक्सिजन पुरून हवेची गुणवत्ता सुधारतात हवामानाचे संतुलन ठेवतात पाणी साठवून ठेवण्यासाठी झाडे महत्त्वपूर्ण कार्य करतात मातीचे रक्षण करणे वर्णन जेव्हा आधार देणे अशी पर्यावरण जाळणे कामे करणारी ही झाडे संस्थेतर्फे वाटप करण्यात आली असून त्यात कडुनिंब, शिसव, करंज, जारूळ व तबेबुईया होती. दोन तासात 1000 झाडे संपली. जे लोकं झाडे लावून संगोपन करतील अशाच लोकांना झाडे वाटप करण्यात आले.या लोकांची नांवे व पत्ते, मोबाईल नंबर घेऊन त्याची लागवड पाहणी भविष्यात संस्थे तर्फे करण्यात येईल.

यावेळी परीसरातील नागरीकांचे मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभले. परीसरातील नागरीकांनी दिलेली वृक्ष लागवड करण्यास मदत तर केलीच शिवाय त्यांची निगा राखण्याची तयारीही दर्शविली.

डॉ. प्रवीण महाजन यांच्या मार्गदर्शनात इंजी. किशोर वंरभे, रवीकांत पैठणकर, इंजी. राजेश ढुमणे, डॉक्टर विजय घुगे, मुन्ना महाजन, भगवानदास राठी, सौ रसिका जगदाळे, प्रतीक महाजन, दीपेश यादव, सतीश ढोबले, कार्तिक ढेंगरे, महेश राठी, विवेक दीक्षित, विनायक कुरेकर, अनिल बोथले इत्यादीसह मौल्यवान झाडे विनामूल्य वाटप करून पर्यावरण दिन साजरा केला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

बेटियों का बढ़ाया हौसला, किया मार्गदर्शन

Thu Jun 6 , 2024
– आरटीपीएस नागपुर सेंटर का आयोजन नागपुर :- आज के वातावरण में लड़कियों को किस प्रकार से सूझबूझ के साथ सकारत्मकता की सोच रखकर आगे बढ़ने पर आरटीपीएस नागपुर सेंटर की ओर से पुलिस ग्राउंड में मार्गदर्शन शिविर का आयोजन किया गया। इस शिविर में मुख्य अतिथि के रूप में उपबोधनकार डॉ. रश्मि शुक्ला ने उपस्थित 1135 बेटियों का हौसला […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com