नागपूर :- आदिम संशोधन व अध्ययन मंडळ व अस्तित्व क्रियेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गोळीबार चौक आणि टिमकी या भागातील गरीबांच्या लहान मुलांचे व्यक्तिमत्व विकास शिबिराचे समापन संपन्न झाले. या समारोप प्रसंगी आदिम नेत्या ऍड.नंदा पराते म्हणाल्या की आपले आईवडील मोलमजुरी करून गरीब परिस्थिती असतांना तुम्हाला शिक्षण देत आहे, आपण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आदर्श समोर ठेऊन शिक्षणाची आवड निर्माण झाली पाहिजे , या हेतूने उन्हाळी ३२ वर्षापासुन सुरू असलेले व्यक्तिमत्व विकास शिबिर या माध्यमातून हलबा जमातीतील गरीब असलेल्या कुटूंबात शिक्षणाचे महत्व व विद्यार्थींचे व्यक्तिमत्व विकास होते, गरिबांच्या मुलांनी हालअपेष्टा सहन करून उच्च शिक्षण घेतल्यास तो ध्यानी विद्यार्थी वाघासारखा गुरगुरुन अन्यायाविरोधात संघर्ष करतो.
नागपुर येथील समारोप क्रार्यक्रम टिमकी, टोपरे विहीरजवळ झाला. वासुदेव वाकोडीकर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच प्रमुख अतिथी आदिम नेत्या ऍड. नंदा पराते व मंचावर डॉक्टर हेमचंद्र रामटेककर , बलवंतजी मेश्राम, , रवी पराते, हरीश निमजे,. शालिनी निमजे, . सरोज निमजे, प्रकाश निमजे उपस्थितित साजरा करण्यात आले.
कार्यक्रमाच्या संचालन दिपाली यांनी केले.शिबिराला यशस्वी करण्याचे श्रेय प्रकाश निमजे, हरेश निमजे, विजय भनारकर, प्रदिप पौनीकर, देवराव उमरेडकर, मोरेश्वर पराते, विष्णु भनारकर तसेच मॉनिटर तुलसी निमजे, दीपाली नंदनवार, प्रियांशी बुरडे, यामिनी छपरघरे, शीतल पौनीकर, आयुष निमजे, नैतिक टाकडीकर, हर्ष धार्मिक, ऋषभ बुरडे, सक्षम हेडाऊ, आरुचि गौरकर, सेजल गौरकर पुष्कर बुरडे, आयुष धापोडकर, हर्ष कुंभारे, शुभम उमरेडकर यांचेसह अनेकांचा सहभाग होता.