नागपूर :- भारतीय जनता युवा मोर्चा नागपूर शहराचे उपाध्यक्ष सुरज दुबे यांच्या वाढदिवसा निमित्ताने दक्षिण नागपूर प्रभाग क्रमांक 32 मधील महिलांना निःशुल्क बस सेवा देवून देवदर्शना साठी आदासा, धापेवाडा, कोराडी या ठिकाणी मोफत बस सेवा देण्यात आली. याप्रसंगी दक्षिणचे आमदार मोहन मते यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी वयोवृद्ध महिलांच्या उपस्थितीत वैशाली काळे, अनामिका गिरमकर, प्रशांत गुरव, राहुल कोवे, कुणाल कोहळे आदींची उपस्थिती होती. तसेच उदयनगर मित्रपरिवार सुद्धा यावेळी उपस्थित होते.