संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान :- पोलीस स्टेशन अंतर्गत दोन वेगवेगळ्या स्थळी अज्ञात दोन इसम दुचाकीने येऊन पोलीस असल्याचे खोटे सांगुन दोन वयोवृध्द जेष्ठ नागरिकाना त्याच्या हाताच्या बोटातील सोन्याची अंगठी काढुन खिश्यात ठेवण्याचे सांगुन ते घेऊन हातसपाई करित कागदात दगड गुडाळुन त्याच्या पिशवीत व खिश्यात ठेवुन पसार होऊन दोन जेष्ठ नागरिकांच्या सोन्याच्या दोन अंगठया किमत २७ हजार रूपयाने चोरून फस वणुक झाल्याने पोस्टे ला अज्ञात दोन इसमा विरूध्द गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू करण्यात आला आहे.
सोमवार (दि.११) सप्टेंबर ला सकाळी ९ वाजता मनोहरराव गणपत गजभिये वय ७८ वर्षे रा. शंकर नगर कांद्री-कन्हान सेवानिवृत्त हे पोस्ट ऑफिस कन्हान येथे आरडी चे पैसे भरून १० वाजता पायदळ घरी परत जात असता तारसा रोड वरून गहुहिवरा रोड ने जात असताना दोन इसम दुचाकीने जवळ येऊन येथे वर्मा चे घर कुठे आहे. त्याचे घरी चोरी झाली असुन आम्ही पोलीस वाले आहोत चौकशी करित असल्याचे सांगितले. तेव्हा मला माहित नाही म्हटले तेव्हा त्यातील एका इसमाने म्हटले की, तुमचा हातातील सोन्याचे सामान हे काढुन खिशात ठेवा नाहीतर ते कोणी हिसकुन घेतील असे म्हटल्याने मनोहरराव गजभिये यांनी हातातील ५ ग्रँम ची सोन्याची अंगठी काढुन खिशात ठेवत असताना एकाने म्हटले की कागज देतो ते तुम्ही पिशी ठेवुन द्या. असे म्हटले आणि त्यांनी अंगठी घेऊन त्याची कागदाची पुडी बांधुन माझा पिशवीत ठेवली. व तेथुन निघुन गेले. मनोहरराव थोडे दुर जाऊन पिशवीत ठेवलेली पुडी पाहिली असता त्यात अंगठी नसुन दगट दिसल्याने मला पोलीस असल्याचे खोटे सांगुन माझा हातातील ५ ग्रँम ची सोन्याची अंगठी किमत १५००० रूपयाची चोरून फसवणुक करून दोन्ही इसम पसार झाल्याचे लक्षात आल्याने पोलीस स्टेशन गाठुन तक्रार दाखल केली. तसेच दुस-या घटनेत प्रताप गोकुलिसंग चव्हाण वय ७५ वर्षे रा. वार्ड ५ कांद्री-कन्हान हे सका ळी १०.३० मुलीला होन्डा शोरूम मध्ये कामावर सोडु न दुचाकीने घरी परत जात असताना राष्ट्रीय महामार्गा वरील जे एन दवाखान्याच्या गेट सामोर दोन इसम दुचाकीने जवळ आले. प्रताप चव्हाण यांची दुचाकी थांबवुन म्हटले की, सोने चोरी झाल्याचे पेपर मध्ये आलेले आहे. आम्ही पोलीस असुन त्याची चौकशी करत आहोत तुम्ही तुमचा हातातील सोन्याची अंगठी काढुन खिशात ठेऊन द्या. यामुळे प्रताप चव्हाण यांनी हातातील ४ ग्रँम ची सोन्याची अंगठी काढुन खिशात ठेवत असतांना त्यांनी म्हटले की हे घ्या कागद यात ठेवा असे म्हणुन त्याने अंगठी व पेन घेऊन कागदात गुंडाळुन माझे खिशात ठेवला. प्रताप चव्हाण यांनी घरी जाऊन पाहिले तर कागदात दगड गुंडाळलेला दिसुन आल्याने त्याची ४ ग्रँम सोन्याची अंगठी किमत १२००० रूपयाची चोरून नेऊन फसवणुक केल्याचे लक्षात आल्याने त्यानी सुध्दा पोलीस स्टेशन ला पोहचुन तक्रार दिल्याने कन्हान पोलीसानी मनोहरराव गजभिये यांची ५ ग्रँम सोन्याची अंगठी १५००० रूपये व प्रताप चव्हाण यांची ४ ग्रँम सोन्याची अंगठी किमत १२००० रूपये अश्या दोन सोन्याच्या अंगठया एकुण किमत २७००० रूपयाची अज्ञात दोन इसमानी संगण मत करून पोलीस असल्याचे खोटे सांगुन दोन जेष्ठ नागरिकांची फसवणुक केल्या प्रकरणी कन्हान पोस्टे ला अज्ञात दोन इसमा विरूध्द गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू करून आरोपी चा शोध घेत आहे.
कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत कन्हान व कांद्री परिसरात या अगोदर सुध्दा पोलीस असल्याचे हुबेहुब बतावणी करून तीन घटना झाल्या असुन आता पर्यंत त्या आरोपीचा शोध लागला नसुन परत पुन्हा एकाच दिवसी काही वेळाच्या अंतराने दोन जेष्ठ नागरिकाना थांबवुन पोलीस असल्याचे सांगुन त्यांच्या सोन्याच्या अंगठया चोरी करून त्यांची फसवणुक झाल्याने कन्हा न पोलीसाच्या तपास कार्यावर उलट सुलट चर्चा नागरिकात सुरू झाल्या आहे.