भूमिपूजन होऊन चार वर्ष लोटताहेत तरीही बांधकामाचा मुहूर्त मिळेना

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

-प्रभाग क्र 14 च्या विकासकामाला बसतेय खीळ

कामठी :- महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियांन अंतर्गत 10 कोटी रुपयांच्या मंजूर निधीतून माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शुभ हस्ते प्रभाग क्र 14 येथे 2018 मध्ये पर्जन्य जलवाहिनी बांधकामाच्या 63 लक्ष 18 हजार 150 रुपयांच्या निधीतून रमानगर ते कामगार नगर पर्यंत नाला बांधकामाचे मोठ्या थाटात भूमिपूजन करण्यात आले होते हे भूमिपूजन होऊन आज 4 वर्षाचा कार्यकाळ लोटत आहे मात्र बांधकामाचा मुहूर्त अजूनही मिळालेला नाही.

या 10 कोटी रुपयांच्या मंजूर विकासकामात 2 कोटी 6 लक्ष 24 हजार 936 रुपयांच्या निधीतून बैल बाजार ते कोळसाटाल ते लाला ओली नाला बांधकाम, 64 लक्ष 45 हजार 870 रुपयांच्या निधीतून दरोगा मशीद ते वारीसपुरा मस्जिद ते बागडोर नाला बांधकाम, 1 करोड 77 लक्ष 8 हजार 346 रुपयांच्या निधीतून गौतम नगर ते पोरवाल कॉलेज ते स्लाटर हाऊस नाला बांधकाम , 93 लक्ष 52 हजार 89 रुपयाच्या निधीतून मच्चीपुल ते मांगपुरा नाला बांधकाम, 63 लक्ष 18 हजार 150 रुपयाच्या निधीतून रमानगर ते कामगार नाला बांधकाम , 26 लक्ष 25 हजार 156 रुपयांच्या निधीतून बुनकर कॉलोनी ते पासीपुरा नाला बांधकाम, 3 करोड 38 लक्ष 47 हजार 647 रुपयांच्या मंजूर निधीतून ड्रॅगन पॅलेस टेम्पल ते आजनी नाला बांधकाम , 15 लक्ष 42 हजार 471 रुपयाच्या निधोतून नया गोदाम नाला बांधकाम चा समावेश असून यातील बोटावर मोजणारे एक दोन कामे झाले असतील मात्र यातील इतर मंजूर कामाचा अजूनही बांधकामास सुरुवात झाली नसल्याने नागरिकांत प्रशासनाच्या विरोधात रोष निर्माण होत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

बहिणीच्या चारित्र्यावर संशय घेतल्याने मित्राचा खून

Thu Nov 24 , 2022
नागपूर :- बहिणीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला शिवीगाळ करणाऱ्या मित्राचा युवकाने चाकूने भोसकून खून केला. ही घटना आज गुरुवारी सकाळी दहा वाजता गड्डीगोदाममध्ये घडली. प्रणव राजेश पात्रे (२५, इंदोरा, बाराखोली)असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. सत्येंद्र यादव (२३, मानकापूर) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रणव पात्रे हा भंगार खरेदीव-विक्रीचा व्यवसाय करत होता. तर सत्येंद्र हा दूध विक्रीचा व्यवसाय […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com