कामठी तालुक्यातील ९१.०६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, तालुक्यात पुन्हा मुलांपेक्षा मुली सरस

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल आज बुधवारी जाहीर झाला. कामठी तालुक्याचा बारावीचा निकाल ९१.०६ टक्के एवढा लागला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा तालुक्याचा बारावीचा निकाल ३ टक्क्यांनी कमी लागला असून तालुक्यातील फक्त ३ कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल शतप्रतिशत लागला.     

तालुक्यातून २१३४ मुले व १७७० मुली असे एकूण ३ हजार ९०४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती त्यापैकी १९०२ मुले व १६५३ मुली असे एकूण ३ हजार ५५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एकूण उत्तीर्ण मुलांची टक्केवारी ८९.१२ एवढी आहे. तर ९३.३८ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तालुक्याचा एकूण निकाल ९१.०६ टक्के एवढा लागला आहे. यात १९८ विद्यार्थी प्राविण्य श्रेणी, ११७६ विद्यार्थी प्रथम श्रेणी तर १५२९ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर ५७६ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. मागील वर्षी १२ कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल शतप्रतिशत लागला होता यावर्षी मात्र फक्त ३ महाविद्यालयांनी शंभरी गाठली आहे. यात रामकृष्ण शारदा मिशन ज्यू कॉलेज कामठी, श्री जयंतराव वंजारी कनिष्ठ महा. वडोदा, इंडियन ऑलिम्पियाड कनिष्ठ महा. भिलगाव यांचा निकाल १०० टक्के लागला आहे.

तर एम एम रब्बानी ज्यू कॉलेज कामठी (९४.८८), एस. के. पोरवाल ज्यू कॉलेज कामठी (७९.४४), एस आर लोईया ज्यू कॉलेज कामठी (८५.२९), नूतन सरस्वती गर्ल्स ज्यू कॉलेज कामठी (७५), नूतन सरस्वती बॉईज कनिष्ठ महाविद्यालय कामठी (६८.८८), मास्टर नूर मो. उर्दू कनिष्ठ महा. कामठी (९६.४२), स्वामी अवधेशानंद पब्लिक स्कूल कामठी (८२.३५), विद्या मंदीर ज्यू कॉलेज कोराडी(९३.४३), तेजस्विनी ज्यू कॉलेज कोराडी(९१.३५), आर्टस, कॉमर्स व सायन्स ज्यू कॉलेज कोराडी(९८.३३), भोसला मिलिटरी स्कूल पंचवटी कोराडी (९७.७५) तुळजा भवानी ज्यू कॉलेज गुमथळा (९८.८५), सरस्वती ज्यू कॉलेज न्यू पांजरा कोराडी(९९.०५) सौरभ चांभारे कनिष्ठ महा. टेमसना (९७.५६), स्व. झेड. बाविस्कर कनिष्ठ महा. पावनगाव (६०), प्रागतिक कनिष्ठ महा. कोराडी(९०.२५), श्री गणपती ज्यू.कॉलेज शिरपूर (८९.६५), प्रियांती ज्यू कॉलेज तरोडी (९८.०७) टक्के लागला आहे.

NewsToday24x7

Next Post

भारतीय हातमाग तंत्रविज्ञान संस्थेच्या प्रवेशासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत,२० जून पर्यंत अर्ज करता येणार

Thu May 25 , 2023
नागपूर :- केंद्र शासनाच्या भारतीय हातमाग तंत्रविज्ञान संस्थेच्या सन २०२३-२४ या पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्राकरिता एकूण १५ जागांसाठी महाराष्ट्रातून प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग, नागपूर यांच्या मार्फत २० जून २०२३ पर्यत प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत. ओडिशा राज्यातील बरगढ येथे स्थित भारतीय हातमाग तंत्रविज्ञान संस्थेच्या पदवीका अभ्यासक्रमाकरिता राज्यातून १३ जागा तर आर्थिक्‍ दुर्बल घटकासाठी १ जागा तसेच वेंकटगिरी येथील कॅम्पस करिता २ […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com