– साबां विभागाचे निःशुल्क आरोग्य तपासणी शिबिर
नागपूर :- सिव्हील लाईन्स येथील बांधकाम संकुल परिसर आणि रवी भवनाच्या शासकीय विश्रामगृह येथे आयोजित एक दिवसीय आरोग्य तपासणी शिबीरात 448 कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांनी तपासणी करून घेतली. उप अभियंता संजय उपाध्ये यांच्या कल्पक मार्गदर्शनाखाली सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, शंकरा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि मेड लॅब यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्यविषयक चाचण्या व समुपदेशनाचा कार्यक्रम घेण्यात आला.
शिबिराचे उद्घाटन मुख्य अभियंता दिनेश नंदनवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि मनपाचे मुख्य अभियंता राजीव गायकवाड यांच्या यांचे हस्ते पार पडले. प्रमुख अतिथी म्हणून जनार्दन भानुसे, सुषमा बोंद्रे, नरेश बोरकर हे अधीक्षक अभियंते तसेच शंकरा हॉस्पिटलचे डॉ जितेंद्र यादव तसेच डॉ. ममता गुप्ता उपस्थित होत्या.
शिबिरादरम्यान शंकरा हॉस्पिटल चे डॉ संकेत अग्रवाल, डॉ रुपेश अग्रवाल, डॉ विनिता मेहता यांनी आरोग्याची निगा कशी राखावी व काय काळजी घेणे गरजेचे आहे, यासंबंधाने समुपदेशन केले. डॉ जितेंद्र यादव यांनी अस्थिरोग उपचार व प्रबंधन यावर माहिती दिली. मुख्य अभियंता नंदनवार यांनी अध्यक्षीय भाषणात आरोग्याचे महत्व विषद केले. शिबिरात निःशुल्क सेवा देणार्या विविध डॉक्टर्स, परिचारीक, मेड लॅब चे संचालक सारंग वर्हाडे यांनी रुग्ण तपासणी केली.
संचालन राजेन्द्र बारई यांनी तर आभार कार्यकारी अभियंता अभिजित कुचेवार यांनी मानले. यावेळी उप अभियंता संजय उपाध्ये, दीप्ती रथकंठीवार यांच्यासह मोठ्या संख्येने अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनीष देशमुख, विद्या देशमुख, संदीप चाफले, संतोष खार्डे, विद्या लांजेवार, अबोली गजभिये, मंजुषा लोहि, लोणारे शाखा अभियंता तसेच आनंद राठोड यांच्यासह कर्मचार्यांनी सहकार्य केले.
आयुर्वेदात उपचारापेक्षा प्रतिबंधाला अधिक महत्व
आयुर्वेदात उपचारापेक्षा प्रतिबंधाला अधिक महत्व देण्यात आले आहे. दैनंदीन जीवनात आयुर्वेदीक तत्वांचा समावेश केल्यास आरोग्य टिकवून ठेवण्यास आणि संभाव्य आरोग्य विषयक चिंता दूर करण्यास मदत ठरू शकते. आयुर्वेदाच्या जीवनशैलीच्या तत्वानुसार रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करून आजारी पडण्याचा धोका कमी करता यईल. अशी माहिती एन्जॉय आरोग्यमच्या संचालिका, समुपदेक आयुर्वेद तज्ज्ञ डॉ अश्विनी उपाध्ये यांनी दिली. तसेच सकस आवाहार आणि तणाव रहित जिवन शैली यावर त्यांनी मार्गदर्शन केले.